हप्तेवसुलीस कंटाळून तरुणाची आत्महत्या! दोघा पोलिसांची होणार चौकशी

पोलिसांच्या त्रासाला कंटाळून सरकोली येथील तरुणाने केली आत्महत्या
Crime
CrimeMedia Gallary

पंढरपूर (सोलापूर) : पोलिसांनी केलेल्या अवैध वाळू वाहतूक कारवाईनंतर नैराश्‍येतून सोमनाथ भालेराव (रा. सरकोली, ता. पंढरपूर) (Pandharpur) या तरुणाने शुक्रवारी (ता. 25) द्राक्षाच्या शेतात आत्महत्या केली होती. ग्रामीण पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांच्या हप्ते वसुलीच्या तगाद्यामुळे सोमनाथने आत्महत्या केल्याचा थेट आरोप मृताच्या नातेवाइकांनी केला आहे. या गंभीर आरोपानंतर दोन पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाने (District Superintendent of Police Office) दिले आहेत. येथील उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम (Sub-Divisional Police Officer Vikram Kadam) यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चौकशी करून वरिष्ठ कार्यालयाला तातडीने वस्तुनिष्ठ अहवाल द्यावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. चौकशीतून काय सत्य बाहेर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (A young man from Pandharpur committed suicide after being harassed by the police)

Crime
सप्टेंबरपर्यंत नवे निर्बंध कायम, 'या' जिल्ह्यांना सावधानतेचा इशारा

सरकोली (ता. पंढरपूर) येथील सोमनाथ भालेराव (वय 30) या तरुणाने शुक्रवारी (ता. 25) अवैध वाळू वाहतूक कारवाईच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने तालुक्‍यात मोठी खळबळ उडाली आहे. आत्महत्येप्रकरणी पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचारी जबाबदार आहेत. संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी नातेवाइकांनी पोलिस ठाण्यात मृतदेह ठेवून आंदोलनही केले. कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतर नातेवाइकांनी आंदोलन मागे घेतले.

सरकोली येथे भीमा नदीतून अवैध वाळू उपसा व वाहतूक सुरू आहे. पोलिसांनी या भागात अनेक वेळा कारवाई देखील केली आहे. त्यानंतरही अवैध वाळू वाहतूक सुरूच आहे. सोमनाथ भालेराव हा देखील अवैध वाळू वाहतूक करत होता. त्याच्यावर यापूर्वी गुन्हाही दाखल आहे. दरम्यान, अवैध वाळू वाहतूक करण्यास संबंधित दोन पोलिस कर्मचारी सोमनाथला पाठीशी घालत होते. त्यांच्याच सांगण्यावरून तो वाळू वाहतूक करत होता. कारवाई न करण्यासाठी तो पोलिसांना हप्ता देखील देत होता. हप्ते घेऊनही पोलिसांनी कारवाई केली. त्याच नैराश्‍येतून शुक्रवारी सोमनाथने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली, असा आरोप त्याचा भाऊ आबासाहेब भालेराव यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपाची पोलिस विभागाने गंभीर दखल घेतली असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी चौकशी सुरू केली आहे. चौकशीनंतर दोषींवर कारवाई केली जाईल, असेही वरिष्ठ कार्यालयालयाकडून सांगण्यात आले.

Crime
सांगोल्यातील जनतेचा पाणी संघर्ष थांबणार?

या प्रकरणात मृताच्या नातेवाइकांनी काही गंभीर आरोप केल्याने दोन पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे. पंढरपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. तातडीने चौकशी करून अहवाल देण्याच्या सूचना दिल्या आहेत. दोषी आढळून आल्यास संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

- अतुल झेंडे, अप्पर पोलिस अधीक्षक, सोलापूर (ग्रामीण)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com