तीन रूग्णालयात उपचार घेऊनही तरूणाची दहा दिवसांची झुंज अपयशी

Corona
Corona esakal
Summary

विजयपूर रोडवरील गणेश नगरातील 37 वर्षीय तरूणाला कोरोनाची बाधा झाली.

सोलापूर : विजयपूर रोडवरील (Vijaypur road) गणेश नगरातील 37 वर्षीय तरूणाला कोरोनाची (Corona) बाधा झाली. त्यानंतर त्याला 8 मे रोजी कामगार विमा रूग्णालयात (Insurance Hospital) (ईएसआय) उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्याला 10 मे रोजी महापालिकेच्या बॉईज हॉस्पिटलमध्ये (Boy's Hospital) दाखल केले. तिथेही त्याच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने 17 मे रोजी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल केले. मात्र, त्याच दिवशी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू (Death) झाला. (A young man from Solapur succumbed to his injuries despite being treated at three hospitals)

Corona
ओरिसावरुन आज येणार ऑक्‍सिजन एक्‍सप्रेस !

सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी (कणकण) अशी प्राथमिक लक्षणे असलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी. जेणेकरून त्यांच्यावर वेळेत निदान करणे शक्‍य होईल, असे आरोग्य विभागाने वारंवार नागरिकांना आवाहन केले आहे. तरीही अंगावर आजार काढणाऱ्यांची संख्या लक्षणीय राहिली आहे. त्यामुळेच अनेकांचा मृत्यू झाला आहे. असाच अनुभव शहरात अनेकदा येऊ लागला आहे. मजरेवाडी येथील 42 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह पुरूष उपचारासाठी 9 मे रोजी एका खासगी रूग्णालयात दाखल झाला. मात्र, तिथून त्यांना 17 मे रोजी दुसऱ्या रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्यांचाही कोरोनाने बळी घेतला. तर दुसरीकडे मंत्री चंडक विहार (होटगी रोड) येथील 49 वर्षीय कोरोना बाधित पुरूष 28 एप्रिलला एका रूग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. त्यांच्यावर 20 दिवस उपचार सुरु होते. तरीही, कोरोनापुढे त्यांची जगण्याची झुंज अपयशी ठरली.

Corona
जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची दीड लाखांकडे वाटचाल !

मृतांचे ऑडीट करून उपाययोजना

शहर व ग्रामीण भागातील मृतांची संख्या आता चार हजारांकडे वाटचाल करीत आहे. शहरात कोरोना रूग्णांची संख्या कमी होत असतानाही मृत्यूदर अजूनही चिंताजनकच आहे. तर ग्रामीण भागात रूग्णसंख्येचा आलेखही वाढत असून मृत्यूदराने प्रशासनाचे चिंता वाढविली आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने मृत्यूदर रोखण्यासाठी मृतांचे ऑडीट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कोरोनामुळे मृत झालेल्या रूग्णाची हिस्टोरी तपासली जात आहे. त्यानुसार त्याच्या मृत्यूचे नेमके कारण शोधून मृत्यूदर रोखण्यासाठी उपाययोजना केले जाणार आहेत. (A young man from Solapur succumbed to his injuries despite being treated at three hospitals)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com