आदित्य ठाकरेंचा सांगोला दौरा राजकीय नसून फक्त नुकसानीची पाहणी व शेतकऱ्यांशी संवाद दौरा

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसानीची पाहणे करणे व शेतकऱ्यांशी संवाद साधने हाच आदित्य ठाकरे यांच्या सांगोला दौऱ्याचा हेतू असून यामध्ये कोणताही राजकीय हेतू नाही.
Anil Kokil
Anil Kokilsakal
Summary

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसानीची पाहणे करणे व शेतकऱ्यांशी संवाद साधने हाच आदित्य ठाकरे यांच्या सांगोला दौऱ्याचा हेतू असून यामध्ये कोणताही राजकीय हेतू नाही.

सांगोला - अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसानीची पाहणे करणे व शेतकऱ्यांशी संवाद साधने हाच आदित्य ठाकरे यांच्या सांगोला दौऱ्याचा हेतू असून यामध्ये कोणताही राजकीय हेतू नाही. शिवसेना आजपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी असून यापुढेही असणार आहे असे मत सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकिळ यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले.

युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे बुधवारी (ता. 9) सांगोला दौऱ्यावर येणार आहेत. सांगोला तालुक्यातील संगेवाडी व मांजरी येथील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या दौऱ्याअगोदर सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांनी सांगोला येथील हॉटेल रॉयल येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कोकीळ म्हणाले की, आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणार असणारे येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये उत्साह आहे. हा शेतकऱ्यांचे झालेले नुकसानीचा पाहणी व त्यांचा संवाद दौरा प्राथमिक स्वरूपाचा आहे. शेतकऱ्यांच्या भावनांचा या सरकारने विचार न केल्यास यापुढे निश्चितपणे काहीतरी ठोस पर्याय केला जाईल.

आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या समस्या व भावनांचा आवाज शासन दरबारी निश्चितपण उठवतील. या दौऱ्यामध्ये युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याबरोबर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील असणार आहेत. शिवसेना आजपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशीच उभे आहे व यापुढेही असणार आहेत. हा दौरा कोणतेही राजकीय हेतूने आखला नसून हा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करणे व त्यांच्याशी संवाद साधणे हाच हेतू आहे. राजकीय दौरेही यापुढे निश्चितपणे होतील. यावेळी जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, तालुकाप्रमुख सूर्यकांत घाडगे, शहराध्यक्ष कमरुद्दीन खतीब, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख आशाताई टोणपे व ॲड. पुनम अभंगराव, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख गणेश इंगळे, युवा सेनेचे विस्तारक उत्तम ऐवळे, लक्ष्मण हाके, शंकर मेटकरी, सुभाष भोसले, तुषार इंगळे, रघुनाथ गायकवाड, सौरभ चव्हाण, समाधान चव्हाण इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com