सोलापूरात मुख्यमंत्र्यांविरुध्द आम आदमी पार्टीची पोलिसात तक्रार 

aap parti agesnt cm.jpg
aap parti agesnt cm.jpg

सोलापूर : वीज दरवाढीच्या मुद्यावर येथील आपच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत विजापूर नाका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

आम आदमी पक्षाच्या वतीने राज्यभरात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात वीज दरवाढ करून जनतेची फसवणूक केल्याच्या तक्रारी पोलिसात देण्याचे आंदोलन करण्यात आले. त्यानुसार विजापूर नाका पोलिस स्टेशनमध्ये आपचे पश्‍चिम महाराष्ट्र संघटन मंत्री सागर पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष ऍड. खतीब वकील, शहराध्यक्ष अस्लम शेख, जिल्हा उपाध्यक्ष प्राजक्त चांदणे, शहर उपाध्यक्ष हेमंत जाधव, शहर प्रवक्ता रहीम शेख़, युवा अध्यक्ष निहाल किरनळ्ळी व रॉबर्ट गौडर यांनी दिली. 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीरनाम्यातून 300 युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी घरगुती वीजदर तीस टक्‍क्‍यांनी कमी करणार, असे वचन दिले होते. या आश्वासनाचा प्रचार त्यांनी विविध माध्यमातून केला होता. त्या वचनांवर विश्वास ठेवून राज्यातील जनतेने शिवसेनेच्या 56 उमेदवारांना निवडून दिले. 

यामुळे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर जनतेला दिलेली वचन पाळणे यांची राजकीय आणि नैतिक जबाबदारी होती. परंतु त्यांनी दिलेले वचन न पाळून जनतेची फसवणूक केलेली आहे. राज्यात महामारीचे संकट असतांना ता.1 एप्रिलपासून वीज दरवाढ करून जनतेला फसवले आहे. 
आपने दरवाढ रद्द करण्यासाठी घेराव, वीज कार्यालयांना टाळे ठोको अशी आंदोलन केली परंतु सरकारने यास प्रतिसाद दिलेला नाही. 
ज्या अर्थी सरकारपक्ष असलेले शिवसेनेचे मुख्यमंत्री निवडणुकीदरम्यान दिलेले आश्वासन पाठपुरावा करूनही पाळत नाही. त्याअर्थी ही जनतेची जाणीवपूर्वक केलेली फसवणूक आहे. भारतीय दंड संहितेनुसार कलम 415 (फसवणूक) आणि 420 नुसार (अप्रामाणिकपणा बेईमानी) प्रमाणे हा गुन्हा आहे. तसेच लोकप्रतिनिधी कायदा कलम 123 (ब) (भ्रष्ट व्यवहार-पद्धती) प्रमाणे मते मिळवण्यासाठी खोटी आश्वासने देता येत नाहीत. 

याच पद्धतीने जर आमिष दाखवून फसवणूक करत असेल तर त्या व्यक्ती वा संस्थेवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतात. एवढेच नव्हे तर महामारीच्या संकट काळी वीजदर वाढवून जनतेसोबत बेईमानी करीत आहेत. त्यामुळे पिडीत आणि फसवल्या गेलेल्या जनतेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी या तक्रारीत केली आहे. 

संपादन : अरविंद मोटे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com