esakal | कोरोनाचे आव्हान स्वीकारत "त्याने' केली नोकरी सोडून आयटी कंपनीची स्थापना!
sakal

बोलून बातमी शोधा

IT Company

कोरोनाचे आव्हान स्वीकारत "त्याने' केली आयटी कंपनीची स्थापना!

sakal_logo
By
प्रकाश सनपूरकर

कोरोनाच्या आव्हानात्मक काळात त्याने सोलापुरात डिजिटल मार्केटिंगची आयटी कंपनी स्थापन करून केलेल्या स्टार्टअपचा प्रयोग यशस्वी झाला.

सोलापूर : पुण्यातील नोकरी सोडून सोलापुरातील लघुउद्योजकांना ऑनलाइन मार्केटची उपलब्धी, अंध व्यक्तींसाठी मोबाईल ऍप, महावन ऍपची निर्मितीपर्यंत शुभम अग्रवाल या आयटी इंजिनिअरने (IT Engineer Shubham Agarwal) केलेली कामगिरी आगळीवेगळी ठरली. कोरोनाच्या आव्हानात्मक काळात त्याने सोलापुरात डिजिटल मार्केटिंगची (Digital marketing) आयटी कंपनी स्थापन करून केलेल्या स्टार्टअपचा (Start-up) प्रयोग यशस्वी झाला. या माध्यमातून त्याने 40 जणांना रोजगारही उपलब्ध करून दिला. (Accepting Corona's challenge, Shubham Agarwal set up an IT company)

हेही वाचा: राष्ट्रीयकृत बॅंकांमध्ये 5858 लिपिकांची होणार भरती! अधिसूचना जारी

वालचंद कॉलेजमध्ये (WIT) इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करून शुभम अग्रवाल हा पुण्यात नोकरीसाठी पोचला. लॉकडाउन (Lockdown) सुरू झाल्यानंतर सोलापुरात वर्क फ्रॉम होम करत असताना शहरात थांबूनदेखील आपल्याला ऑनलाइन पद्धतीने क्रिएटिव्हिटीला (Creativity) चालना मिळू शकते, हे लक्षात आले. अचानक लॉकडाउन सुरू झाल्याने अनेक लघुउद्योजक व विक्रेते काउंटर बंद झाल्याने अडचणीत सापडले होते. शहरातील एक पापड उद्योग लॉकडाउनमध्ये अडचणीत सापडला. तेव्हा त्यांना वेबसाईट डिझाईन, ऑनलाइन रिस्पॉन्ससह थेट ऍमेझॉन व फ्लिपकार्टसारख्या ऑनलाइन मार्केटमध्ये स्थान मिळवून दिल्यानंतर लॉकडाउनमध्येच हा उद्योग सुरळीत होऊन कामगारांना पूर्वीप्रमाणे रोजगार मिळू लागला. शहरातील लघू उद्योजकांच्या व्यवसायवाढीसाठी डिजिटल मार्केटिंगचे महत्त्व अधोरेखित झाले.

वेबसाईट डिझाईन, डिजिटल मार्केटिंग, प्रॉडक्‍ट डिझाईन, ऍप निर्मिती, व्यवसायाचे ब्रॅंडिंग यांसारख्या अनेक कामात शुभम अग्रवालने इतर शहरातील तरुणांना ऑनलाइन रोजगार उपलब्ध करून दिला. अंध व्यक्तींसाठी मोबाईल ऍप त्याने विकसित केले. त्यानंतर राज्य शासनाच्या वनखात्याचे "महावन' हे ऍप त्याने तयार केले. जयपूर, बंगळूर, हैदराबाद, पुणे येथील उद्योजकांना सेवा उपलब्ध करून दिली. अगदी कोरोनाच्या (Covid-19) आव्हानात्मक काळातच शुभमने आयटी कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीमार्फत आता एकूण 40 जणांना ऑनलाइन रोजगार मिळवून दिला आहे.

हेही वाचा: दहावी-बारावी निकालाची ठरली तारीख !

विदेशातही कामगिरी

ऑस्ट्रेलियातील सेंटेड कॅन्डल उत्पादनाचे डिझाईन त्याने केले. दुबईच्या सुपर स्टोअरसाठी डिझाईनचे काम केले. तर "यूएस'मधील एका कॉफी कंपनीच्या पॅकेट डिझाईनचे काम केले. त्यामुळे आता विदेशातील कामाचा प्रतिसाद वाढू लागला आहे.

शुभम अग्रवाल यांची कामगिरी

  • लघू उद्योगांना ऑनलाइन प्रेझेंटेशन

  • उत्पादकांना प्रॉडक्‍ट डिझाईन

  • वेबसाईट निर्मिती

  • महावन ऍपची निर्मिती

  • ऑनलाइन ब्रॅंडिंग

  • आयटी कंपनीची स्थापना

पुण्यात राहण्यापेक्षा सोलापुरात राहून ऑनलाइन पद्धतीने चांगली कामगिरी करता येते, हा अनुभव कोरोनामुळे आला. तसेच आपल्याच शहरातील उद्योजकांना ऑनलाइनच्या माध्यमातून जगाची बाजारपेठ खुली करून देता येते, असा आत्मविश्‍वास मला मिळाला.

- शुभम अग्रवाल, आयटी इंजिनिअर, सोलापूर

loading image