राष्ट्रीयकृत बॅंकांमध्ये 5858 लिपिकांची होणार भरती! अधिसूचना जारी

IBPS Clerk 2021 : राष्ट्रीयकृत बॅंकांमध्ये 5858 लिपिकांची होणार भरती! अधिसूचना जारी
Bank
BankCanva

राष्ट्रीयकृत बॅंकांमध्ये लिपिक पदाच्या सरकारी नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या किंवा बॅंक लिपिक भरती 2021 ची तयारी करत असलेल्या इच्छुकांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

सोलापूर : राष्ट्रीयकृत बॅंकांमध्ये (Nationalized banks) लिपिक पदाच्या सरकारी नोकरीसाठी (Government job) इच्छुक असणाऱ्या किंवा बॅंक लिपिक भरती 2021 ची तयारी करत असलेल्या इच्छुकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सनल सिलेक्‍शन (आयबीपीएस)ने (Institute of Banking Personnel Selection) पंजाब नॅशनल बॅंक (Punjab National Bank), युनियन बॅंक ऑफ इंडिया (Union Bank Of India), बॅंक ऑफ बडोदा (Bank Of Baroda), बॅंक ऑफ इंडिया (Bank Of India), कॅनरा बॅंक (Canara Bank) आणि इतर बॅंकांमध्ये लिपिक संवर्ग पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. रविवारी, 11 जुलै रोजी संस्थेने जाहीर केलेल्या आयबीपीएस क्‍लर्क (CRP Clerk-XI 2022-23) च्या अधिसूचनेनुसार, यावर्षी कॉमन रिक्रूटमेंट प्रोसेस (सीआरपी) (Common Recruitment Process)च्या माध्यमातून एकूण 5858 पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. मागील वर्षी भरती प्रक्रियेद्वारे आयबीपीएसने लिपिक संवर्गातील 1558 रिक्त जागा घोषित केल्या होत्या. (Notification has been issued for recruitment of clerks in nationalized banks)

Bank
दहावी-बारावी निकालाची ठरली तारीख !

आजच अर्ज करा

आयबीपीएस लिपिक (CRP Clerk-XI 2022-23) च्या अधिसूचनेनुसार बॅंकांमध्ये 5858 लिपिक पदे आज, 12 जुलै 2021 पासून लागू करता येतील. अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 ऑगस्ट 2021 निश्‍चित करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, उमेदवारांना आजपासून ते 1 ऑगस्ट दरम्यान 850 रुपये विहित अर्ज शुल्क भरावे लागेल. दुसरीकडे, आयबीपीएस लिपिक इलेव्हन भरती वेळापत्रकानुसार प्राथमिक परीक्षा प्रशिक्षण 16 ऑगस्ट रोजी घेण्यात येईल. प्राथमिक परीक्षा 28 व 29 ऑगस्ट रोजी व 4 सप्टेंबरला पुन्हा घेण्यात येईल. त्यानंतर 31 ऑक्‍टोबर 2021 रोजी मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे.

Bank
विद्यापीठाने केली परीक्षेची वेळ कमी! प्रॉक्‍टरिंग प्रणालीतून हालचालींवर नजर

असा करा अर्ज

इच्छुक आणि पात्र उमेदवार आयबीपीएस लिपिक भरती 2021 साठी आयबीपीएसच्या ibpsonline.ibps.in पोर्टलला भेट देऊन नोंदणी करू शकतात. अर्ज पोर्टलला भेट दिल्यानंतर उमेदवारांना प्रथम नवीन नोंदणीच्या लिंकवर क्‍लिक करून नोंदणी करावी लागेल. यानंतर नाव, मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडीचा तपशील नोंदणीसाठी भरावा लागेल. यानंतर, वाटप केलेल्या नोंदणी क्रमांक आणि पासवर्डद्वारे लॉग इन करून उमेदवार आपला आयबीपीएस लिपिक 2021 ऑनलाईन अर्ज सबमिट करू शकतील.

भरती सूचनेसाठी https://www.ibps.in/wp-content/uploads/DetailedAdvtCRP-Clerks-XI_2121.pdf या लिंकला क्‍लिक करा.

अर्ज करण्यासाठी हिीीं://ळलिीेपश्रळपश.ळलिी.ळप/लीलिश्र11र्क्षीप21/ येथे क्‍लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com