
अक्कलकोट/करकंब : गाणगापूर (जि. कलबुर्गी) येथे कर्नाटक परिवहन महामंडळाची बस व रिक्षाची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात वसमत (जि. हिंगोली) येथील दोन महिला जागीच ठार झाल्या. तर करकंब (ता. पंढरपूर) येथे मुक्कामी असणाऱ्या संत गजानन महाराज पालखीचे दर्शन घेऊन परत जात असताना झालेल्या अपघातात जळोली (ता. पंढरपूर) येथील दोन महिला भाविकांचा जागीच मृत्यू झाला.