
'दंड भरा अन् पुढे जा' ही पध्दत नकोच! ‘सहा’ नियम पाळल्यास होणार नाहीत अपघात
सोलापूर : मोटार वाहन कायद्यानुसार प्रत्येक वाहनचालकांना नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. त्या बेशिस्त वाहन चालकाचा पुढे अपघात होतो.
दंडाची पावती किंवा रोखीने दंड दिला की ते वाहन सोडून दिले जाते. मात्र, त्या बेशिस्त चालकाचे वाहन जप्त करून त्याच्याकडून पुन्हा नियम मोडणार नाही, अशी ॲक्शन घ्यायला हवी. परंतु, बहुतेकवेळा तसे काहीच होत नाही.
हेही वाचा: दंड वाढला, तरीही अपघात कमी नाहीत! दरवर्षी बाराशे कोटींची दंड वसुली
बेशिस्तवाहनांना स्वयंशिस्त लागावी म्हणून प्रत्येक शहर-ग्रामीणमध्ये स्थानिक पातळीवर वाहतूक पोलिस आहेत. दुसरीकडे महामार्गांवर प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) विभागाचे अधिकारी, कर्मचारी असतात. त्यानंतर जानेवारी २०१९ पासून राज्यात ‘वन स्टेट वन चालान’अंतर्गत महामार्ग पोलिसांनी विविध महामार्गांवरील बेशिस्त वाहनचालक शोधून त्यांना स्वयंशिस्त लागावी म्हणून इंन्टरसेफ्टर वाहने उभी केली. आतापर्यंत साडेसहा कोटी वाहनचालकांना (काही वाहनांना अनेकदा दंड) ऑनलाइन दंड झाला आहे. अनेकांना चुकीच्या पध्दतीने दंड आले आहेत. तर आपण नियम मोडला की नाही हे बऱ्याचदा त्या वाहनचालकासुध्दा माहिती होत नाही. अशावेळी ही यंत्रणा अपघात रोखण्यासाठी की केवळ दंड वसुलीसाठीच आहे, असे प्रश्नचिन्ह उपस्थित होते. कधी कधी एखादे वाहन पुण्यावरून निघाले की सोलापुरात येईपर्यंत त्याला ठिकठिकाणी दंड होतो. अपघात रोखण्यासाठी मनापासून काम करणे अपेक्षित असून नुसती दंड वसुली करून अपघात कमी होणार नाहीत.
हेही वाचा: वाहनचालकांनो, घरी कोणीतरी वाट पाहतंय! १५ कोटींचा दंड भरला, पण नियम नाही पाळला
‘हे’ नियम पाळा अन् अपघात टाळा
- दुचाकीस्वारांनी राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्गावरून जाताना हेल्मेट घालावे
- चारचाकी चालकांनी सीटबेल्टचा वापर करावा, गाडीतील सर्वांनीच सीटबेल्ट वापरावा
- विरूध्द दिशेने वाहन चालवू नये, वाहन चालविताना मोबाईल टॉकिंग नकोच
- क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी किंवा मालाची वाहतूक करू नये, माल वाहतूक वाहनातून प्रवासी वाहतूक नको
- वाहनांचा वेग मर्यादित ठेवावा, झोप येत असल्यास ओढाताण करून वाहन चालवू नका
- ओव्हरटेक जरा जपून, लहान मुलांना वाहनाच्या चालकापासून दूर ठेवावे, जपून चालवा वाहन
हेही वाचा: वाट पाहीन, पण लालपरीनेच जाईन! दररोज ३१ लाख प्रवाशांचा एसटीतून प्रवास
युवक हे देशाची संपत्ती आहेत, त्यांचे अपघाती मृत्यू होऊ नयेत म्हणून यंत्रणा अहोरात्र काम करीत आहे. तरीदेखील अनेकजण वारंवार वाहतूक नियम मोडतात. अशी वाहने जप्त करून त्यांचे समुपदेशन केले जाणार आहे. पण, वाहतूक नियम तंतोतंत पाळल्यास निश्चितपणे अपघात कमी होतील.
- अर्चना गायकवाड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर
Web Title: Accidents Will Not Happen If Six Traffic Rules Are
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..