वाहनचालकांनो, घरी कोणीतरी वाट पाहतंय! १५ कोटींचा दंड भरला, पण नियम नाही पाळला

बेशिस्त वाहनचालकांकडून एप्रिल २०२१ ते २२ मे २०२२पर्यंत जिल्ह्यातील वाहतूक पोलिसांनी तब्बल १५ कोटींचा दंड वसूल केला आहे. तीन लाखांहून अधिक वाहनचालकांनी या काळात वाहतूक नियम मोडला आहे.
Traffic rules strict
Traffic rules strictsakal

सोलापूर : मोटार वाहन कायद्यानुसार अपघातात कोणाचाही जीव जाणार नाही, यादृष्टीने नियमावली तयार करण्यात आली आहे. तरीदेखील, अनेकजण त्याचे उल्लंघन करतात आणि जगाचा निरोप घेतात. बेशिस्त वाहनचालकांकडून एप्रिल २०२१ ते २२ मे २०२२पर्यंत जिल्ह्यातील वाहतूक पोलिसांनी तब्बल १५ कोटींचा दंड वसूल केला आहे. तीन लाखांहून अधिक वाहनचालकांनी या काळात वाहतूक नियम मोडला आहे.

Traffic rules strict
काँग्रेस, शिवसेनेची स्वबळाची तयारी! ‘या’ प्रमुख कारणामुळे फिस्कटणार महाविकास आघाडी

परिवहन मंत्रालयाने बेशिस्त वाहनचालकांना स्वयंशिस्त लागावी या हेतूने दंडाची रक्कम दुप्पट करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अपघात व अपघाती मृत्यू कमी होतील, बेशिस्तांमुळे होणारी वाहतूक कोंडी होणार नाही, असा विश्वास होता. पण, ना अपघात ना मृत्यू कमी झाले, केवळ दंड वसुलीच वाढली. रस्त्यांवरून वाहन चालविताना चारचाकी चालकांनी सिटबेल्ट लावावेत, वाहनांचा वेग मर्यादित असावा, दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरावे, विरुध्द दिशेने वाहन चालवू नये, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी किंवा माल वाहतूक करू नये, अशा नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. दरमहा बेशिस्त वाहनचालकांकडून सोलापूर शहर-ग्रामीणमधील वाहतूक पोलिस, राष्ट्रीय महामार्ग पोलिस आणि आरटीओकडून अंदाजित दोन कोटींचा दंड वसूल करतात. अद्याप जिल्ह्यातील तीन लाख वाहनचालकांकडे दहा कोटींचा दंड थकलेला आहे.तरीदेखील, अनेकजण पुन्हा पुन्हा नियम मोडतात. पण, हेल्मेटचा वापर केलेले बहुतेक दुचाकीस्वारांचा जीव बचावला असून सिटबेल्टमुळे अनेक चारचाकी चालक किंवा त्या वाहनातील लोक बचावले आहेत. त्यामुळे नियमांचे पालन गरजेचेच आहे.

Traffic rules strict
वाट पाहीन, पण लालपरीनेच जाईन! दररोज ३१ लाख प्रवाशांचा एसटीतून प्रवास

घरी कोणतरी वाट पाहतेय, याचे भान असावे
घरातून बाहेर गेलेल्या मुलाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या आई-वडिलांची ना स्वत:ची ना आपल्यावर अवलंबून असलेल्या घरातील चिमुकल्यांची व पत्नीचा बरेच वाहनचालक काहीही विचार करीत नाहीत. बेदरकारपणे वाहन चालवितात, नियमांचे पालन न करता बेशिस्तपणे वाहन चालवितात आणि जगाचा निरोप घेतात. आपल्या जाण्याने कुटुंबाची किती वाताहात होईल, याचा विचार प्रत्येकांनी करायला हवा. जेणेकरून अपघात होणार नाहीत, असे आवाहन पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले आहे.

Traffic rules strict
सोलापूर: काँग्रेसला गळती अन्‌ नेत्यांचे लक्ष मुंबई-दिल्लीत; राष्ट्रवादीचा डाव?

जिल्ह्यातील दंड वसुली(जानेवारी ते २० मेपर्यंत)
जानेवारी
१.२८ कोटी
फेब्रुवारी
१.०४ कोटी
मार्च
१.१८ कोटी
एप्रिल
१.६९ कोटी
२० मेपर्यंत
९९.२९ लाख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com