
Police raid in Adarsh Nagar exposes sex racket; woman rescued from brothel.
सोलापूर : शहरातील लक्ष्मीनारायण टॉकीजमागील आदर्श नगरातील नयन लॉजवर कुंटणखाना सुरू असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने छापा टाकला. त्यावेळी तेथे एक पीडिता आढळली. पोलिसांनी तिची सुटका केली असून लॉज मालक भारत पांडुरंग जाधव (वय ५८) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्याला न्यायालयाने २० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.