MSRTC buses lined up in Pandharpur to transport devotees for the Kartiki Yatra.
Sakal
सोलापूर
Pandharpur Kartiki Yatra: पंढरपूर कार्तिकी यात्रेसाठी ११५० जादा बस; वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासन सज्ज; उद्यापासून ६ नोव्हेंबरपर्यंत सेवा
Pandharpur Gears Up for Kartiki Yatra: राज्यभरातील व्यापारी पंढरपूरला येतात. राज्याच्या कानाकोपऱ्यांतून कार्तिकी एकादशीसाठी भाविकांची मोठी रीघ लागते. या कालावधीत होणाऱ्या गर्दीचे योग्य नियोजन करण्यासाठी एसटी प्रशासनाने सुमारे ११५० जादा गाड्यांचे नियोजन केले आहे.
सोलापूर : कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे भरणाऱ्या यात्रेसाठी २९ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत एसटीच्या ११५० जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. यामध्ये सोलापूर विभागाच्या १५० गाड्यांचा समावेश आहे. वारकऱ्यांच्या सेवेसाठी राज्य परिवहन महामंडळ सज्ज झाले आहे.

