
सोलापूर : कृषी विभागाकडील विविध योजनांसाठी सोडतीद्वारे लाभार्थी निवडून दीड महिन्याहून अधिक कालावधी लोटला आहे. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे लाभार्थ्यांना अद्याप महाडीबीटी पोर्टलवर कागदपत्रे अपलोड करता आले नाहीत. याबाबत शेतकऱ्यांनी तालुकास्तरावर तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने लाभार्थी लाभापासून वंचित राहिले आहेत.