विद्यापीठीय कर्मचारी संपामुळे लटकले 'पीएचडी' प्रवेश!

विद्यापीठीय कर्मचारी संपामुळे लटकले 'पीएचडी' प्रवेश! 795 उमेदवार प्रतीक्षेत
विद्यापीठीय कर्मचारी संपामुळे लटकले 'पीएचडी' प्रवेश! 795 उमेदवार प्रतीक्षेत
विद्यापीठीय कर्मचारी संपामुळे लटकले 'पीएचडी' प्रवेश! 795 उमेदवार प्रतीक्षेतesakal
Summary

विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून, आज त्याचा नववा दिवस आहे.

सोलापूर : विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून, आज त्याचा नववा दिवस आहे. परंतु, अजूनही शासनाकडून त्यावर तोडगा काढण्यात आलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सत्र परीक्षांबरोबरच पीएचडी (PhD) प्रवेशाची प्रक्रियादेखील ठप्प झाली आहे. दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला, तरीही पीएचडीच्या उमेदवारांना प्रवेश मिळालेला नाही. (Admission to the PhD was stopped due to the strike of the university staff)

विद्यापीठीय कर्मचारी संपामुळे लटकले 'पीएचडी' प्रवेश! 795 उमेदवार प्रतीक्षेत
रेड झोनमध्ये 13 जिल्हे! Omicron व Corona चे वाढले अ‍ॅक्‍टिव्ह रुग्ण

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने (Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University) विविध विषयांच्या 795 जागांसाठी 'पेट' घेतली. त्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून पात्र उमेदवारांच्या मुलाखतीही पार पडल्या. गुणवत्ता यादीतील त्रुटींमुळे विद्यापीठाने एसटी संपाचे कारण पुढे करून दोनदा मुलाखती पुढे ढकलल्याची चर्चा त्यावेळी रंगली. विद्यापीठाने ऑफलाइन व ऑनलाइन स्वरूपात मुलाखतीही घेतल्या. मात्र, त्यानंतर पुढे काहीच कार्यवाही झाली नाही. तेवढ्यात आता सातवा वेतन आयोग लागू करा, मागील थकबाकी द्या, पाच दिवसांचा आठवडा करा, अशा विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन (Agitation) सुरू केले. या आंदोलनाचा विद्यापीठाच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या संपावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्याकडून सकारात्मक तोडगा निघाल्यानंतर विद्यार्थ्यांची सत्र परीक्षा, पीएचडी प्रवेशाचे प्रश्‍न मार्गी लागणार आहेत. आंदोलनापूर्वी उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांना मागण्यांसंदर्भात तोडगा काढण्यासाठी निवेदन देऊनही त्यांनी त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे आता सकारात्मक तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरुच राहील, असा इशारा शिक्षकेतर कर्मचारी संघटनांकडून देण्यात आला आहे.

विद्यापीठीय कर्मचारी संपामुळे लटकले 'पीएचडी' प्रवेश! 795 उमेदवार प्रतीक्षेत
NEET PG समुपदेशनाला विलंब! IMA ची पंतप्रधानांना हस्तक्षेपाची विनंती

250 मार्गदर्शकांवर 795 उमेवारांचा भार

विद्यापीठाअंतर्गत पीएचडी उमेदवारांसाठी जवळपास 250 मार्गदर्शक (गाईड) आहेत. पाच वर्षे अध्यापनाचा अनुभव आणि पीएचडीची पदवी घेऊन दोन वर्षे झालेल्यांची गाईड म्हणून निवड केली जाते. प्राध्यापक म्हणून सेवेत असलेल्यांकडे आठ तर सहयोगी प्राध्यापकांकडे सहा आणि असिस्टंट प्राध्यापकांकडे चार विद्यार्थ्यांची जबाबदारी दिली जाते. विद्यापीठाने यंदा प्रथमच 795 जागांसाठी जाहीरात काढली आणि मुलाखती घेतल्या. त्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी त्या अडीचशे प्राध्यापकांवर सोपविली जाणार असल्याची माहिती प्रशासकीय अधिकारी डॉ. विकास कदम (Vikas Kadam) यांनी दिली. काही दिवसांत त्यांचे प्रवेश निश्‍चित होतील, असा विश्‍वासही त्यांनी या वेळी व्यक्‍त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com