
Nematawadi farmers rejoice as the Shiv road reopens after 15 years, easing transportation and connectivity.
Sakal
पंढरपूर: गेल्या पंधरा वर्षांपासून अतिक्रमित झालेला नेमतवाडी-करकंब या दोन गावांचा शिवरस्ता अखेर खुला करण्यात आला आहे. रस्त्यावरील अतिक्रमणे काढल्याने रस्त्याने आता मोकळा श्वास घेतला आहे. येथील शिव रस्ता खुला झाल्याने या भागातील जवळपास १०० हून अधिक शेतकऱ्यांचा रहदारीचा मार्ग मोकळा झाला आहे.