शिक्षकांना आता डेंग्यू सर्व्हेची ड्यूटी! दररोज 150 घरांचे टार्गेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षकांना आता डेंग्यू सर्व्हेची ड्यूटी! दररोज 150 घरांचे टार्गेट

कोरोना ड्यूटी रद्द झाल्यानंतर कुटुंबासमवेत आनंदात असलेल्या प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांना आता डेंग्यूच्या सर्व्हेची ड्यूटी करावी लागणार आहे.

शिक्षकांना आता डेंग्यू सर्व्हेची ड्यूटी! दररोज 150 घरांचे टार्गेट

सोलापूर : कोरोना (Covid-19) ड्यूटी रद्द झाल्यानंतर कुटुंबासमवेत आनंदात असलेल्या प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांना आता डेंग्यूच्या (Dengue) सर्व्हेची ड्यूटी करावी लागणार आहे. शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढू लागल्याने शिक्षक आणि आशा सेविकांच्या माध्यमातून घरोघरी कंटेनर (पाणी साठवलेली भांडी पडताळणी) सर्व्हे केला जाणार आहे. एकावेळी 248 शिक्षकांना ड्यूटी दिली जाणार असून, त्या संदर्भातील आदेश आज काढले जाणार आहेत.

हेही वाचा: सौरऊर्जेवर चालणार आता स्प्रिंकलर! 'ऑर्किड'च्या विद्यार्थ्यांचा आविष्कार

कोरोनाच्या दोन्ही लाटेत को-मॉर्बिड (पूर्वीचे गंभीर आजार असलेले रुग्ण) रुग्णांसह त्यांच्या कुटुंबीयांचा सर्व्हे करण्याची जबाबदारी शहरातील खासगी प्राथमिक, माध्यमिक व महापालिकेच्या शिक्षकांवर होती. त्यांनी तीन- चारवेळा घरोघरी जाऊन सर्व्हे केला. शहरातील अनेकांकडून शिक्षकांना बोलणे ऐकावे लागले. तरीही, शहरातील कोरोना कमी होण्यामध्ये शिक्षकांचे मोठे योगदान राहिले आहे. कोरोनाची ड्यूटी करताना काही शिक्षकांना जीव गमवावा लागला तर 37 पेक्षा अधिक शिक्षकांना कोरोनाची लागण झाली. ऑनलाइन शिक्षण देत असतानाच दुसरीकडे त्यांना कोरोना ड्यूटी करावी लागली. कोरोना कमी झाल्याने शिक्षकांना कोरोना ड्यूटीतून सुटी मिळाली. परंतु, काही दिवसांतच त्यांना पुन्हा डेंग्यू सर्व्हेची नवीन ड्यूटी करण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. पहिल्यांदा 248 शिक्षकांना आठवड्यासाठी ड्यूटी दिली जाणार आहे. त्यानंतरही सर्व्हे सुरू राहिल्यास टप्प्या- टप्प्याने नवीन तेवढ्याच शिक्षकांची नियुक्‍ती दिली जाईल, असे प्रशासनाधिकारी कादर शेख यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: वटवाघळांमुळे रखडले अ‍ॅडव्हेंचर पार्क! निवडणुकीपूर्वी उद्‌घाटननाट्य

शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आता शहर डेंग्यूमुक्‍त करण्यासाठी घरोघरी कंटेनर सर्व्हे केला जाणार आहे. डेंग्यूच्या अळ्या होऊ नयेत म्हणून नागरिकांनी खबरदारी घ्यावी. साठवलेल्या स्वच्छ पाण्यावर झाकण असावे. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. घरात, घराशेजारी पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी.

- डॉ. अरुंधती हराळकर, आरोग्याधिकारी, सोलापूर महापालिका

अगोदर प्रशिक्षण अन्‌ त्यानंतर घरोघरी सर्व्हे

शहरातील डेंग्यूचा प्रादुर्भाव कमी व्हावा, या हेतूने एक लाख 98 हजार कुटुंबांचा सर्व्हे केला जाणार आहे. आशा सेविका व शिक्षकांच्या एका टीमला दररोज 150 घरांचा सर्व्हे करण्याचे टार्गेट दिले आहे. तत्पूर्वी, सर्व्हे करणाऱ्या शिक्षकांना एक दिवसाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर बुधवारपासून सर्व्हेला सुरवात केली जाईल, अशी माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. सर्व्हेसाठी आवश्‍यक शिक्षकांची यादी उपायुक्‍त धनराज पांडे यांच्याकडे दिली आहे. त्यानुसार पथके तयार केली जाणार असून, शिक्षकांनी ड्यूटी करणे बंधनकारक आहे, अशी माहिती प्रशासनाधिकारी कादर शेख यांनी दिली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :maharashtraviralupdate
loading image
go to top