

PWD officials inspecting the Lamboti bridge in Solapur after floodwaters receded; safety checks continue at Tirhe and Vadakbal bridges.
Sakal
सोलापूर: सप्टेंबर महिन्यात सीना नदीस आलेल्या पुराने लांबोटी (ता. मोहोळ), तिऱ्हे (ता. उत्तर सोलापूर) व वडकबाळ (ता. दक्षिण सोलापूर) पुलास स्पर्श करून पाणी गेले. इतिहासात पहिल्यांदाच इतके पाणी आल्याने पुलास काही धोका झाला आहे का? याची तपासणी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात लांबोटी पुलाची तपासणी पूर्ण झाली असून अद्याप अहवाल आला नसल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प संचालक स्वप्नील कासार यांनी सांगितले.