

Solapur Accident
Sakal
सोलापूर: बोरामणी येथून देवदर्शन करून गावी जाताना अक्कलकोट रोडवरील शांती चौकात दुचाकीस्वाराचा अपघात झाला. सिमेंटच्या बल्करला कट लागला आणि दुचाकीवरील (एमएच १३, डीजे ९१७८) महिला चाकाखाली आली. गंभीर जखमी होऊन त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. जयश्री अरुण जाधव (वय ४५, तेलगाव सीना, ता. उत्तर सोलापूर) असे मयत महिलेचे नाव आहे.