

Tension Escalates as Farmers Reject Oral Proposal in Gokul Factory Protest
sakal
उ.सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकूळ साखर कारखान्याकडे १३० कोटी रुपयांचे ऊस बिल थकल्याने धाराशिव, सोलापूर जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांचे पूनम गेटजवळ आंदोलन सुरू आहे. आज (गुरुवारी, ता. २८) आंदोलनाचा चौथा दिवस होता. थकीत ऊस बिलासंदर्भात दोन महिन्यांत कारवाई पूर्ण करून शेतकऱ्यांच्या उसाची रक्कम दिली जाईल, हा प्रशासनाचा प्रस्ताव ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी फेटाळत आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला.