

Solapur Sees Strong Economic Push as Banks Cross Farm Loan Targets
सोलापूर : जिल्ह्यातील शेतीला चालना देण्यासाठी वार्षिक पतपुरवठा आराखड्यात २०२५-२६ साठी ९ हजार ८०० कोटींची तरतूद करण्यात आली होती. जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, खासगी राष्ट्रीयकृत, डीसीसी बँक, स्मॉल फायनान्स यांनी तब्बल १० हजार ८६ कोटी रुपयांचा कर्जपुरवठा केला आहे. त्यामध्ये ४ हजार ५१२ कोटी रुपयांचे पीक कर्ज तर ५ हजार ५७३ कोटी रुपयांचे शेतीसाठी मुदत कर्जवाटप केले आहे. आराखड्यात दिलेल्या उद्दिष्ठाच्या १०२ टक्के कर्जपुरवठा करण्यात जिल्ह्यातील बँका यशस्वी झाल्या आहेत.