
Government Officials Begin Crop Loss Survey in Sangola After Heavy Rains
Sakal
सांगोला : सांगोला तालुक्यात एकूण ९ मंडलांपैकी ६ मंडलांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अतिवृष्टी झालेल्या सहा मंडलांमध्ये तातडीने पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून फक्त तीन मंडळे यातून वगळली आहेत. तथापि नदी, ओढ्यांच्या लगतच्या पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या पिकांचेही पंचनामे करण्यात दिले आहेत, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव यांनी दिली.