

Political Stir in District as Pooja Khandare Slams Ajay Dasari
Sakal
सोलापूर: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील अंतर्गत कलह व मतभेद काही केल्या मिटण्याची चिन्हे नाहीत. ऐन महापालिका निवडणुकीत पक्षातील अंतर्गत वाद दैनंदिन चव्हाट्यावर येत आहेत. काहींनी पक्ष सोडून गद्दारी केली असली, तरी प्रा. अजय दासरी हे पक्षात राहूनच पक्षाशी गद्दारी करत आहेत, असा खळबळजनक आरोप युवती सेना जिल्हाप्रमुख पूजा खंदारे यांनी केला आहे. जिल्हाप्रमुख दासरी यांना घरचा आहेर देतानाच खंदारे यांनी, दासरी यांनी युवती सेनेत लुडबूड करू नये, असा थेट वार केला आहे.