'विरोधकांची दुटप्पी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने हानीकारक!' | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'विरोधकांची दुटप्पी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने हानीकारक!'
'विरोधकांची दुटप्पी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने हानीकारक!'

'विरोधकांची दुटप्पी भूमिका ST कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने हानीकारक!'

पंढरपूर (सोलापूर) : राज्यात अनेक महामंडळांमध्ये लाखो कर्मचारी काम करत आहेत. एकीकडे केंद्र सरकार (Central Government) अनेक सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करत आहे. याविषयी विरोधी पक्षातील नेते काहीच बोलत नाहीत, मात्र एसटी महामंडळाचे (Maharashtra State Transport Corporation) सरकारीकरण करावे यासाठी आंदोलन करत आहेत. त्यांची ही राजकीय दुटप्पी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने हानीकारक आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी दोन पावले मागे येऊन राज्य सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा. कर्मचाऱ्यांनी टोकाची भूमिका घेऊ नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या वेळी केले.

हेही वाचा: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा

गेल्या 60 वर्षात कधीच एसटी सरकारमध्ये विलिनीकरणाचा मुद्दा समोर आला नव्हता. मात्र मुद्दामहून हा प्रश्न चिघळवला जात आहे. राज्यातील विरोधी पक्ष विविध मुद्दे काढून राज्याला मुद्दाम अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोपही अजित पवार यांनी केला.

सध्या तरी राज्याला उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही. अजून आर्थिक घडी नीट बसलेली नाही. पगार, पेन्शन आणि दैनंदिन खर्च तसाच असल्याने पेट्रोल आणि डिझेलवर लावण्यात आलेले कर कमी होण्याची शक्‍यता नाही. तरीही येत्या अधिवेशनापूर्वी कर कमी करायचे असतील तर किती आर्थिक नुकसान सोसावे लागेल ते पाहून निर्णय घेण्यात येईल, असे अजित पवार यांनी सांगितले. रावसाहेब दानवे यांनी पेट्रोल, डिझेलचे दर हे अमेरिकासारखे देश ठरवतात, या त्यांच्या वक्तव्याचे समर्थन केले. तर केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी पालखी महामार्गासाठी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे वारकऱ्यांची वाट सुकर झाल्याचे सांगत, नितीन गडकरी यांच्याही कामाची स्तुती अजित पवार यांनी केली.

हेही वाचा: 'काम बंद' आंदोलनातील एसटी कर्मचाऱ्यांना वेतन नाहीच !

या वेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आदी उपस्थित होते.

loading image
go to top