
श्रीगोंदे: तालुक्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंगळवारी (ता. ५) मुंबई येथे एकत्रितपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीत २९ ऑगस्ट रोजी श्रीगोंद्यात कार्यकर्ता मेळावा घेण्याचे निश्चित करण्यात आले. या मेळाव्याच्या निमित्ताने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाणार आहे.