esakal | अक्कलकोट: शिरवळवाडीजवळ अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

अक्कलकोट: शिरवळवाडीजवळ अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार

sakal_logo
By
चेतन जाधव

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील शिरवळवाडी जवळच्या पुलावर सिमेंट वाहतूक बल्करच्या जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सायंकाळी साडेआठच्या सुमारास घडली. महादेव काशिनाथ आलदी (वय ४५ रा.आदर्श नगर,कुमठा नाका, सोलापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

हेही वाचा: उपळाईच्या शेतकऱ्याने नादच केलाय थेट! 25 गुंठ्यांत 16 टन डाळिंब

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, या अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव महादेव काशिनाथ आलदी वय ४५ रा.आदर्श नगर, कुमठा नाका सोलापूर असे आहे. या अपघाताची फिर्याद मयताचा भाऊ राजशेखर आलदी यांनी दिली. अक्कलकोट-आळंद रस्त्यावरील शिरवळवाडी जवळील पुलावर भरधाव येणाऱ्या सिमेंट वाहतूक बल्कर क्र. एमएच १२ आरएन २३७५ चा चालक योगीराज श्रीशैल मठपती रा.स्टेशन रोड, समतानगर अक्कलकोट यांनी स्कुटी दुचाकी क्र. एमएच १३ एई १०७३ ला जोरदार धडक दिल्याने महादेव काशिनाथ आलदी वय ४५ रा.आदर्श नगर, कुमठा नाका, सोलापूर यांचा जागीच मृत्यू झाला.

या पुलावर खड्डा पडला असून, खड्याचा अंदाज न आल्याने पाठीमागून येणाऱ्या सिमेंट वाहतूक करणाऱ्या बल्करने दुचाकीस्वारास चिरडले. यात महादेव काशिनाथ आलदी वय ४५ रा.आदर्श नगर सोलापूर यांचा जागीच मृत्यू झाला. मयत आलदी हे सोलापूरहुन आळंद जि.गुलबर्गा येथे एका घरगुती कार्यक्रमासाठी गेले होते. आळंदहुन सोलापूरकडे निघाले असता शिरवळवाडी जवळ हा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकी २५ फूट लांब जाऊन पडली होती.

हेही वाचा: 'डीसीसी'त भीती 'मी पुन्हा येईन'ची!

घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. मयत आलदी यांचे प्रेत रुग्णवाहिकेतून अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून, सकाळी शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले. चालक योगीराज मठपती हा स्वतःहून अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात हजर झाला असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनास्थळी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश भावीकट्टी, पोलीस हवालदार सलीम पिरजादे, पो.कॉ. शिवलिंगय्या स्वामी, पो.कॉ. राम चौधरी, सीताराम राऊत, रणजित अवताडे आदींनी उपस्थिती होती.

loading image
go to top