
सोलापूर : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना शाई फासून धक्काबुक्की केल्याप्रकरणी अटकेतील शिवधर्म फाऊंडेशनचा दीपक काटे व त्याचा साथीदार भवानेश्वर बबन शिरगिरे यांना गुरुवारी (ता. १७) अक्कलकोट न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आणि त्याचवेळी वकिलांच्या अर्जावरून संशयितांना जामीनही मंजूर केला. जामीन देताना न्यायालयाने काही अटी घातल्या आहेत.