
Akkalkot lashed by heavy rain; MLA Kalyanshetti inspects flood damage, panchnamas started.
Sakal
अक्कलकोट: अक्कलकोट शहर व तालुक्यातील काही भागात सलग तिसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी दुपारनंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे पूर्वपदावर येत असलेले जनजीवन पुन्हा विस्कळित झाले आहे. अक्कलकोट शहराला लागून असलेल्या समर्थ नगरमध्ये आजच्या पावसामुळे तळ्याचे स्वरूप आलेले होते. ओढे भरून मोठ्या प्रमाणात वाहत होते.