
Multiple aspirants from all parties vie for the Akkalkot Municipal Council mayor post, with BJP leading in numbers.
Sakal
-चेतन जाधव
अक्कलकोट: अक्कलकोट नगरपालिकेचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाल्याने अनेक मातब्बर इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मागील थेट नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव होते. यंदा नगराध्यक्षपद खुले झाल्याने अनेक मातब्बर महिलांसह पुरुषही दावेदार आहेत.