Akkalkot Fire: अक्कलकोटमध्ये सात ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी; अडीच ते तीन कोटींचे नुकसान, चालकांच्या प्रसंगावधानाने २० वाहने वाचली

Seven Trucks Gutted in Akkalkot Fire 20 Vehicles Saved: सहा ट्रक जळून खाक, एका ट्रकचेही नुकसान; अक्कलकोटच्या आगीत चालकांच्या धाडसाने २० वाहने बचावली
Akkalkot Fire News Seven Trucks Catch Fire on Solapur Road Causing Crore Worth Losses as Drivers Save 20 Other Vehicles

Akkalkot Fire News Seven Trucks Catch Fire on Solapur Road Causing Crore Worth Losses as Drivers Save 20 Other Vehicles

sakal

Updated on: 

अक्कलकोट शहर: दिवाळी पाडव्याच्या दिवशी अक्कलकोट येथील सोलापूर रोडवरील हॉटेल समर्थ शिवनेरीच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेत उभ्या सात मालट्रक व सिमेंट बल्कर ट्रकला आग लागून मोठे नुकसान झाले. मंगळवारी (ता. १०) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत सहा ट्रक पूर्णतः जळून खाक झाले, तर एका ट्रकचे सुमारे ५० टक्के नुकसान झाले. या आगीत अंदाजे अडीच ते तीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रसंगावधान साधून चालक रमेश जाधव याने पोलिसांच्या सूचनेनुसार काम करीत नऊ वाहने जळण्यापासून वाचवली. आगीपासून वेळीच वाहने हटवल्याने वीस ते पंचवीस ट्रक जळण्यापासून वाचल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी व त्यांच्या सहकारी नगरसेवक, कार्यकर्त्यांनी वेळीच धाव घेत अग्निशामकच्या गाड्या विविध ठिकाणाहून मागवून पाण्याचा फवारा केल्याने मोठा अनर्थ टळला.

Loading content, please wait...