

Pune ACB Action In Malshiras Two Agents Arrested For Taking 550000 Rupees In Alleged 25 Lakh Bribe Case
sakal
माळशिरस : अकलूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळवून देण्यासह ‘पीसीपीएनडीटी’चे कलम न लावण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या नावाने २५ लाख रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात दोन खासगी दलालांना पाच लाख ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी (ता. २८) दुपारी अडीचच्या सुमारास माळशिरस येथील पालखी महामार्गावरील पिलीव रोडच्या पुलाखाली, जानकर प्लॉटजवळ करण्यात आली.