Akluj Murder Case
अकलूज : येथे २२ ऑक्टोबर रोजी नीरा नदीपात्रात सापडलेल्या युवकाच्या मृतदेहाप्रकरणी तपास झाला. या तपासात किरकोळ वादातून नदीत बुडवून त्याचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी अकलूज पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली. न्यायालयाने त्यांना चार दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.