esakal | सोलापूर बाजार समितीचे सर्व लिलाव बंद 
sakal

बोलून बातमी शोधा

3APMC_solapur_web_1_0.jpg

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचनेनूसार बाजार समितीत उपाययोजना केल्या जात आहेत. बाजार समितीमधील लिलाव बंद करावेत अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. लिलाव बंद झाल्याचा परिणाम ग्राहकांच्या भाजीपाला मागणीवर व शेतकऱ्यांच्या शेतमालावर होऊ नये यासाठी पर्यायी व्यवस्था निर्माण केली जाणार आहे. महापालिकेने सोलापुरात दिलेल्या मैदानांवर भाजीपाला विक्री केली जाणार असून या मैदानावर सोशल डिस्टिन्सचे पालन होते की नाही? हे पाहण्यासाठी बाजार समितीचे कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. 
- कुंदन भोळे, जिल्हा उपनिबंधक, सोलापूर 

सोलापूर बाजार समितीचे सर्व लिलाव बंद 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात शेतमाल खरेदी व विक्रीसाठी गर्दी होत असल्याने बाजार समितीमधील सर्व लिलाव उद्यापासून (मंगळवार) बंद करण्याची सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केली आहे. त्यानूसार आज जिल्हाधिकारी कार्यालयात बाजार समिती उपसभापती श्रीशैल नरोळे, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांच्यासह जिल्हा प्रशासन व समिती प्रशासनातील अधिकारी-पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. 

हेही वाचा - मोठी बातमी! मृत कोरोनाबाधिताचे मोबाईलद्वारे कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग 

सोलापूर शहरातील नागरिकांना भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण होऊ नये. शेतकऱ्यांचा शेतमाल विक्री व्हावा यासाठी पर्यायी व्यवस्था निर्माण केली जाणार आहे. शेतकऱ्यांचा शेतमाल विक्री करण्यासाठी सोलापूर महापालिकेच्यावतीने सहा मैदाने उपलब्ध करून दिली आहेत. कर्णिकनगर, अंत्रोळीकरनगर, गोविंदश्री मंगल कार्यालय, अरविंदधाम वसाहत, सुंदरमनगर व होम मैदान अशी सहा मैदाने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. आवश्‍यकता भासेल तसे बाजार समितीमधील भुसार मार्केट सुरू करण्याबाबत पुढील टप्प्यात निर्णय घेतला जाणार आहे. सोलापुरात साखर, खाद्यतेल, डाळी उपलब्ध आहेत. सोलापुरातील नागरिकांसाठी भविष्यात गहू आणि तांदूळ आवश्‍यक आहे. हे धान्य घेऊन येणाऱ्या वाहनांना भुसार मार्केटमध्ये प्रवेश देण्याबाबतही आजच्या बैठकीत चर्चा झाली. 

हेही वाचा - सोलापूरकर झाले अलर्ट...! 

बाजार समितीची होणार हेल्पलाईन 
सोलापूर बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात व परिसरात येणाऱ्या शेतकऱ्यांचे नाव, मोबाईल क्रमांक, त्याच्याकडे असलो शेतमाल, सोलापुरातील वाहतूकदार, व्यापारी, आडते यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. या सर्वांसाठी हेल्पलाईन तयार केली जाणार आहे. शेतकरी कोणता शेतमाल घेऊन येणार आहेत? ग्राहकांना कोणत्या शेतमालाची आवश्‍यकता आहे? या बाबतचा समन्वय बाजार समितीमधील कंट्रोल रुमच्या माध्यमातून ठेवला जाणार आहे. त्यासाठी हेल्पलाईन नंबर लवकरच प्रसिध्द केला जाणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी दिली.

loading image