मोठी बातमी ! मृत कोरोनाबाधिताचे मोबाईलद्वारे कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग 

IMG-20200413-WA0124.jpg
IMG-20200413-WA0124.jpg

सोलापूर : तापमान खूप असल्याने सोलापुरात कोरोना येणार नसल्याच्या अविर्भावात वावरणाऱ्या सोलापूरकरांना रविवारी (ता. 12) धक्‍का बसला. जोडबसवण्णा चौकातील एक व्यक्‍ती "कोरोना'ने मृत्यू झाल्याने सोमवारी (ता. 13) शहरातील रस्ते बंद केले होते. तत्पूर्वी, तो व्यक्‍ती किराणा दुकानदार असल्याने त्याच्या संपर्कातील व्यक्‍तींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोबाइल ट्रेसिंग सुरू केले आहे. तर, त्याच्या घराच्या एक किलोमीटर परिसरातील नागरिकांच्या वैद्यकीय तपासणीसाठी महापालिकेने स्वतंत्र वैद्यकीय पथक नियुक्‍त केले आहेत. 

जोडबसवण्णा चौक परिसरातील व्यक्‍तींची घरोघरी जाऊन वैद्यकीय तपासणी केली जात आहे. महापालिकेने त्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्‍त केले असून पुढील 14 दिवस या व्यक्‍तींची नियमित माहिती घेतली जाणार आहे. तत्पूर्वी, या व्यक्‍तीच्या संपर्कातील सुमारे 60 व्यक्‍तींना वैद्यकीय तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यात "कोरोना'ची लक्षणे आहेत का, याची पडताळणी केली जात आहे. शहरातील सात पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या परिसरात आठ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. मागील दोन दिवसांत संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी 116 जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्यात फौजदार चावडी पोलिसांनी 20, जेलरोड पोलिसांनी 56, विजापूर नाका पोलिसांनी सात, सलगरवस्ती पोलिसांनी 22, एमआयडीसी पोलिसांनी 11 जणांविरुद्ध कारवाई केल्याचे पोलिस आयुक्‍तालयाकडून सांगण्यात आले. 

पोलिस आयुक्‍तांचे नवे आदेश 

  • जोडबसवण्णा परिसरात वाहतूक, फिरणे, रस्त्यांवर रेंगाळणे, उभारण्यास 19 एप्रिलपर्यंत बंदी 
  • राजेंद्र चौक ते देगावकर हॉस्पिटलपर्यंतचा एक किलोमीटर परिसर सील 
  • अत्यावश्‍यक विभाग, मेडिकल चालू असतील. त्या परिसरातील वाहन वापर व वाहतूक सवलत रद्द 
  • कोरोना संक्रमणशील क्षेत्रातील व्यक्‍तींच्या हालचालींवर पोलिसांचा असणार 24 तास खडा पहारा 
  • आपत्कालीन परिस्थितीत विशेष परवानगीने पोटफाडी चौकातून प्रवेश करता येईल : पुन्हा बाहेर जाण्यास मनाई 
  • जीवनावश्‍यक वस्तू पुरविणाऱ्यांसाठी सकाळी 10 ते दुपारी 12 पर्यंत असेल परवानगी 
  • परिसरातील बॅंका बंद असतील तर नागरिकांच्या सोयीसाठी एटीएम सुरू ठेवण्यास परवानगी

पायाने जखमी असल्याने तो बाहेर गेला नाही 
"कोरोना' प्रादुर्भावाने मृत्यू झालेल्या व्यक्‍तीचा काही महिन्यांपूर्वी अपघात झाला होता. त्याच्या एका पायात रॉड घातलेले असल्याने तो सोलापुरातून बाहेर गेला नसल्याचे त्याच्या कुटुंबातील व्यक्‍तींनी सांगितले. मात्र, त्याची सोलापुरातील तीन नगरांत ये- जा होती. दुकानात विक्रीसाठी वस्तू आणण्यास तो सोलापूर बाजार समितीतही जाऊन आल्याचे सूत्रांनी सांगितले. आता, त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्‍तींची माहिती त्याच्या मोबाईलद्वारे घेतली जात असून संबंधित व्यक्‍तीची तत्काळ वैद्यकीय तपासणी केली जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com