
“Sina River flood submerges barrages in Madha taluka; Madha-Vairag transport suspended.”
esakal
-किरण चव्हाण
माढा : माढा तालुक्यातील सीना नदीला महापूर आला असून यामुळे माढा - वैराग अर्थात माढा-तुळजापूर ही वाहतूक ठप्प झाली आहे. परंडा तालुक्यातील सीना कोळेगाव धरणातून ४६००० क्युसेक्सहून अधिक पाण्याचा विसर्ग सीना नदीत सोडल्यामुळे माढा तालुक्यातील सिना नदीकाठच्या सर्व गावांमध्ये पूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे. माढा तालुक्यातील सिना नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली गेले आहेत.