कोरोनाचा पडला विसर! सांगोल्यात विकेंडमध्ये ही सर्व व्यवहार सुरूच

कोरोनाचा पडला विसर! सांगोल्यात विकेंडमध्ये ही सर्व व्यवहार सुरूच
Summary

शनिवारीही येथील सर्व व्यवहार सुरू असताना अचानक पोलीस गाडी आली आणि सर्व व्यवहार पटापटा बंद झाले. आणि विशेष म्हणजे पोलीस गाडी गेल्यानंतर पुन्हा सर्व व्यवहार सुरूही झाले.

महूद (सोलापूर): कोरोना ची तिसरी लाट रोखण्यासाठी सातत्याने नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र सांगोला तालुक्यातील महूद येथे शनिवार व रविवारचा साप्ताहिक लॉकडाउन म्हणजे काय रे भाऊ? अशी टर उडवत याबाबतचे कोणतेही नियम पाळले जात नाहीत. शनिवारीही येथील सर्व व्यवहार सुरू असताना अचानक पोलीस गाडी आली आणि सर्व व्यवहार पटापटा बंद झाले. आणि विशेष म्हणजे पोलीस गाडी गेल्यानंतर पुन्हा सर्व व्यवहार सुरूही झाले.

कोरोनाचा पडला विसर! सांगोल्यात विकेंडमध्ये ही सर्व व्यवहार सुरूच
महूद-पंढरपूर रोडवर पकडला 63.61 लाखांचा गांजा

कोरोना च्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये महूद हा हॉटस्पॉट बनला होता. पहिल्या लाटेमध्ये बहुतांश गावातील तर दुसऱ्या लाटेमध्ये गावासह वाडी-वस्तीवरही रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली होती. या महामारी मध्ये गावातील अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या महामारीच्या अनेक यातना, दुःखद प्रसंग गावाने सोसले व भोगले आहेत. महूद व परिसरातील गावांमध्ये या महामारी मुळे एकेका कुटुंबातील तीन ते चार सदस्यांचा मृत्यू झाला आहे, असे असतानाही याचे गांभीर्य कोठेही पहावयास मिळत नाही. पूर्वीप्रमाणेच येथील मुख्य चौक, बाजारपेठ अशा ठिकाणी रिकामटेकड्या लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होत असते. चौकात, गर्दीच्या ठिकाणी तासनतास उभा राहून गप्पा मारल्या जातात. गप्पा बरोबरच तंबाखू, गुटखा यांचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी सर्वत्र थुंकले जात आहे.

कोरोनाचा पडला विसर! सांगोल्यात विकेंडमध्ये ही सर्व व्यवहार सुरूच
महूद परिसरात अज्ञात जंगली हिंस्र प्राण्याचा वावर ! शेळ्यांवर हल्ला झाल्याने स्थानिकांमध्ये भीती 

बँका, खताची दुकाने, किराणा मालाची दुकाने, दूध संस्था, उपाहारगृहे, शासकीय कार्यालये यासह सर्वच ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी नेहमी पहावयास मिळते. अशा ठिकाणी अनेकजण विना मास्क वावरताना दिसून येतात. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, शारीरिक अंतर पाळावे अशा नियमांचा अक्षरशः फज्जा उडवला जातो. दुकानदारांनी या महामारीच्या दीड वर्ष काळात ग्राहकांना कोणत्याही प्रकारे नियमांचे पालन करण्याचा आग्रह धरलेला दिसत नाही. उलट ग्राहकांना नियम पाळण्याची विनंती केली असता, ग्राहक निघून जातात व व्यवसायावर परिणाम होतो, अशी तक्रार ही अनेक दुकानदारांकडून केली जाते. दुकानदार, व्यवसायिक यांना सायंकाळी चार वाजेपर्यंत ची दिलेली वेळ कोणीही पाळताना दिसून येत नाही. शनिवार व रविवार चा साप्ताहिक लॉकडाऊन येथे फारसा पाळला जात नाही.

कोरोनाचा पडला विसर! सांगोल्यात विकेंडमध्ये ही सर्व व्यवहार सुरूच
महूद उपविभागात पाच लाखांची वीज चोरी ! चोरीत घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांचा समावेश 

नेहमीप्रमाणेच शनिवारी ही येथील सर्व व्यवहार सुरुच होते. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अचानक पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांची गाडी गावांमध्ये घुसली. गावातील सर्व प्रमुख मार्गावरून जाताना गाडीतील पोलिस कर्मचाऱ्याने ध्वनिक्षेपकावरून दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. अचानक गावात घुसलेल्या पोलीस गाडी मुळे व्यावसायिक व ग्राहकांची तारांबळ उडाली. दुकानदारांनी आर्थिक दंड व कारवाईच्या भीतीने पटापट आपली दुकाने बंद केली. यावेळी पोलीस गाडीतून ध्वनीक्षेपका वरून मास्क वापरण्याचे ही आवाहन करण्यात येत होते. यामुळे विना मास्क फिरणारे नागरिक आर्थिक दंडाच्या भीतीने सैरावैरा धावू लागले. साप्ताहिक लाॅकडाउनमुळे दुकाने बंद ठेवावीत, असे आवाहन करून पोलीस निरीक्षकांची गाडी गावातून बाहेर पडली. नागरिक व व्यवसायिकांनी त्याचा कानोसा घेतला. गाडी गावाबाहेर पडली आहे हे लक्षात येताच पुन्हा येथील व्यवहार पूर्ववत झाले.

कोरोनाचा पडला विसर! सांगोल्यात विकेंडमध्ये ही सर्व व्यवहार सुरूच
अतिक्रमणास प्रोत्साहित करणाऱ्या नोंदी रद्द करा ! महूद ग्रामपंचायतीच्या निर्णयाबाबत "बीडीओं'चा आदेश 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे सावट असताना येथील ग्रामकृती समिती पूर्णतः निष्क्रिय झाली आहे. महूद व परिसरातील गावांमध्ये हळूहळू पुन्हा रुग्ण संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे महूद पासून जवळच असलेल्या कोळेगाव, फळवणी (ता.माळशिरस) येथे नुकताच एक-एक आठवड्याचा लॉकडाऊन पाळण्यात आला आहे. तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असताना सर्वांनीच योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी स्थानिक ग्रामकृती समिती व प्रशासकीय यंत्रणेने योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे. अन्यथा तिसऱ्या लाटेचे परिणाम पुन्हा एकदा भोगावे लागतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com