esakal | Solapur : कोरोनामुळे वडिलाचं छत्र हरपलं; तरी विशाखाने त्यांचं स्वप्न सत्यात उतरवलं!
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनामुळे वडिलाचं छत्र हरपलं; तरी विशाखाने त्यांचं स्वप्न सत्यात उतरवलं

वडिलांचा आधार तुटलेल्या विशाखा पाटीलने दुःख उराशी बाळगत मनाशी एकच खूणगाठ बांधली, काहीही झाले तरी वडिलांनी डॉक्‍टर होण्याचे पाहिलेले स्वप्न सत्यात उतरवायचंच.

कोरोनामुळे वडिलाचं छत्र हरपलं; तरी मुलीनं त्यांचं स्वप्न साकारलं

sakal_logo
By
शांतिलाल काशीद

मळेगाव (सोलापूर) : कोरोनाच्या (Covid-19) पहिल्या व दुसऱ्या लाटेत अनेक मुलांचे आई - वडिलांचे छत्र हरपले. घरातील कर्ती व्यक्ती कोरोनाने हिरावून घेतल्याने अनेकांची कुटुंबं उद्‌ध्वस्त झाली. गेल्या सहा महिन्यांपूर्वी अशीच दुर्दैवी घटना बार्शी (Barshi) तालुक्‍यातील सारोळे येथे घडली.

सारोळे येथील शिक्षक विजयकुमार त्रिंबकराव पाटील यांचा कोरोनाच्या संसर्गामुळे उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. वडिलांचा आधार तुटलेल्या विशाखा पाटील (Vishakha Patil) हिने दुःख उराशी बाळगत मनाशी एकच खूणगाठ बांधली, काहीही झाले तरी न खचता, न डगमगता वडिलांनी डॉक्‍टर होण्याचे पाहिलेले स्वप्न सत्यात उतरवायचेच. या ध्येयाने अखेर तिने डॉक्‍टर (Doctor) होण्याचे स्वप्न साकार केले.

वडिलांनी डॉक्‍टर होण्याचे पाहिलेले स्वप्न सत्यात उतरवायचेच म्हणून तिने जोमाने अभ्यास सुरू केला आणि मोठ्या हिंमतीने व जिद्दीने बीडीएस (BDS) डिग्री पूर्ण करून वडिलांचे डॉक्‍टर होण्याचे स्वप्न सत्यात उतरवले. त्यामुळे सारोळे गावात एकमेव महिला डॉक्‍टर होण्याचा बहुमानही तिने मिळवला आहे.

हेही वाचा: Solapur : अठरा लाख व्यक्‍ती कोरोना लसीकरणापासून दूरच !

विशाखा पाटीलचे मूळ गाव सारोळे, आजोळ आंबेगाव व चार मावशीचे गाव गौडगाव येथून तिचे कौतुक केले जात आहे. विशाखा हिने नुकतेच 21 सप्टेंबरला (बॅचरल ऑफ डेंटल सायन्स अर्थात बीडीएस) ही डिग्री रूरल डेंटल कॉलेज, लोणी (जि. पुणे) येथून प्राप्त केली आहे. यासाठी तिला आई शिक्षिका सुवर्णा पाटील, आजोबा अभिमन्यू दळवे, मामा आंबेगावचे सरपंच सुशीलकुमार दळवे, रूरल डेंटल कॉलेजचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाले.

हेही वाचा: पेट्रोल-डिझेल आणखी महागणार! 'ही' आहेत कारणे

कोरोना काळात शाळेतील ड्यूटी बजावत असताना वडील विजयकुमार पाटील व आई सुवर्णा पाटील यांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यात उपचारादरम्यान वडिलांचे निधन झाले. मात्र डॉक्‍टरांना तिच्या आईला वाचविण्यात यश आले. विशाखा पाटील हिने बोलताना सांगितले, की वडिलांचे छत्र हरवणे हा माझ्या जीवनातील सर्वांत मोठा दुःखद प्रसंग आहे. या कठीण प्रसंगातून स्वतःला सावरत वडिलांच डॉक्‍टर होण्याचे स्वप्न चालू वर्षी सुवर्ण कामगिरीने मी ते सत्यात उतरवले आहे. हीच खरी वडिलांना आदरांजली आहे. यासाठी सर्व कुटुंबीय, नातेवाईक, मित्र परिवार व ग्रामस्थांची मोलाची साथ मिळाली.

loading image
go to top