

Who Is Ujjwala Thite The Woman Challenging a 50-Year Empire
Esakal
सोलापुरातील अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्वला थिटे यांनी अर्ज दाखल केलाय. एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभेल अशा नाट्यमय घडामोडी यावेळी घडल्या. उज्वला थिटे यांनी कडेकोट सुरक्षेत उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रवासात अडथळा यायला नको यासाठी उज्वला थिटे पहाटेच अनरमध्ये पोहोचल्या होत्या. त्यानंतर सकाळी सव्वा अकरा वाजता त्यांनी अर्ज भरला. अनगरमध्ये नगराध्यक्षपदासाठी माजी आमदार राजन पाटील यांच्या सुनेला भाजपकडून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्याविरोधात उज्वला थिटे यांनी अर्ज दाखल करत थेट राजन पाटील यांच्या अनगरमधील साम्राज्यालाच आव्हान दिलंय.