
सोलापूर : सोलापूर ग्रामीणमध्ये चोरी, घरफोडी केल्यावर पोलिस आपल्याला निश्चितपणे जेलमध्ये टाकतील, हे ओळखून रेकॉर्डवरील तिघांनी आंध्र प्रदेशातील सराफालाच लुटले. रेल्वे प्रवासात आंध्रातील सराफाकडील साडेतीन किलो दागिने त्यांनी लंपास केले होते. संशयित आरोपी सोलापूर ग्रामीणमधील असल्याने आंध्रप्रदेशातील पोलिस सोमवारी सोलापूरमध्ये आले होते. ग्रामीण पोलिसांनी तिघांना पकडून त्यांच्या ताब्यात दिले.