

राज्यभर चर्चेत आलेली सोलापूर जिल्हयातील अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यपदाची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आदेश जारी केले आहेत.आता सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार पुढील कार्यवाही होणार आहे. यामुळे एकच चर्चा रंगली आहे. अगर नगरपंचायतीत प्राजक्ता पाटील यांचा नगराध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज राहिला आहे. त्या बिनविरोध झाल्या आहेत. मात्र आता या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे.