जुळे सोलापूरकरांचा संताप... अन्यथा महापालिकेचा कर भरणार नाही 

Anger of the jule Solapurkars  otherwise the municipality will not pay taxes
Anger of the jule Solapurkars otherwise the municipality will not pay taxes

सोलापूर : महापालिका अधिकाऱ्यांकडे मागील काही वर्षांपासून प्यायला पुरेसे पाणी द्यावे, ड्रेनेज जोडणी करावी, अंतर्गत रस्त्यांची कामे करावीत यासह अन्य मागण्या सातत्याने केल्या. मात्र, मागील 20 वर्षांपासून नागरिकांना पुरेशा दाबाने पाणी मिळू शकलेले नाही. ड्रेनेजची अर्धवट जोडणी असतानाही युजर चार्जेस घेतले जातात. नियमित कर भरुनही पायाभूत सुविधा महापालिकेकडून मिळालेल्या नाहीत. या पार्श्‍वभूमीवर आता जुळे सोलापुकरांनी पुरेशा प्रमाणात पायाभूत सुविधा दिल्या तरच कर भरु, अशी भूमिका घेतली आहे. 

जुळे सोलापुरातील ओमगर्जना चौक परिसर, कल्याणनगर भाग एक व दोन, दोंदे नगर, वामन नगर, म्हाडा कॉलनी, बॉम्बे पार्क, जगदंबा नगर, आशिर्वाद नगर, स्वामी विवेकानंद नगर यासह अन्य नगरांमधील अंतर्गत रस्त्यांची कामे झालेली नाहीत. नागरिकांना विद्युत मोटारी लावूनही पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. स्ट्रीट लाईट बसवले, परंतु बहूतांश भागात अंधार कायम आहे. मोकाट कुत्र्यांचा व जनावरांचा त्रास वाढला आहे. पावसाळ्यात नागरिकांना घराबाहेर पडता येत नाही. ड्रेनेजची जोडणी नसल्याने अथवा अर्धवट जोडणीमुळे परिसरात अस्वच्छता आहे. अशी परिस्थिती असताना आम्ही कर का भरायचा, असा प्रश्‍न उपस्थित करीत पायाभूत सुविधा द्या आणि नियमित कर घ्या, अशी ठाम भूमिका जुळे सोलापुकरांनी घेतली आहे. दरम्यान, 'सकाळ'ने आमचे प्रश्‍न सत्ताधारी व प्रशासनापर्यंत पोहचविल्याबद्दल जुळे सोलापुरकरांनी आभार मानले. 

पुरेशे पाणी नाही 
मागील 20 वर्षांपूर्वी जुळे सोलापुरकरांसाठी चार इंची पाईपलाईन टाकण्यात आली आहे. आता लोकवस्ती वाढलेली असल्याने नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. अंतर्गत रस्त्यांच्या कामांचीही नागरिकांना प्रतीक्षाच असून पावसाळ्यात घराबाहेर पडणे मुश्‍किल होते. स्ट्रिट लाईटही बऱ्याच ठिकाणी लावलेली नाही. पायाभूत सुविधा पुरेशा प्रमाणात मिळाल्यास नियमित कर भरायला काहीच हरकत नाही. 
- प्रदीप तडकल 

नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ 
जुळे सोलापूर हद्दवाढ भाग होऊन 20 वर्षांहून अधिक काळ लोटला, परंतु नागरिकांना अद्याप पुरेशा प्रमाणात पायाभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. 20 वर्षांपूर्वी टाकलेल्या पाईप लाईनमधूनच पाणी पुरवठा केला जात आहे. पुरेशा दाबाने पाणी नागरिकांना मिळत नसल्याने बाहेरुन पाणी विकत घ्यावे लागते. ड्रेनेजची अर्धवट जोडणी असून अंतर्गत रस्त्यांचेही डांबरीकरण झालेले नाही. पायाभूत सुविधा द्या अन्‌ नियमित कर घ्या, अशी भूमिका आहे. 
- आकाश कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com