
Annchhatra Mandal donates ₹21 lakh to CM Relief Fund for flood victims; initiative praised by CM Devendra Fadnavis.
Sakal
अक्कलकोटः येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस २१ लाखांचा धनादेश दिला. अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वात बुधवारी सोलापूर येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला.