

Small milk producers in Solapur express concern over mandatory licensing rules aimed at curbing adulteration.
sakal
नातेपुते: दूध भेसळीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर भारतीय अन्नसुरक्षा व मानांकन प्राधिकरणाने (एफएसएसएआय) दूध उत्पादक व विक्रेत्यांसाठी नोंदणी किंवा परवाना घेणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे सहकारी दूध संघाबाहेर काम करणाऱ्या स्वतंत्र दूध उत्पादक आणि विक्रेत्यांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोठ्या प्रमाणात भेसळ करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई होण्याऐवजी लहान उत्पादकांनाच लक्ष्य केले जाईल, अशी शंका व्यक्त होत आहे.