RTO Inspector and Associate Arrested in Bribery Case
Sakal
सोलापूर
Anti-Bribery Action:आरटीओ निरीक्षकासह एकाला लाच घेताना अटक; नांदणी तपासणी नाक्यावर जालना पथकाची कारवाई, माेह नडला..
RTO Bribery Case Marathi Breaking News: आरटीओ निरीक्षकासह खाजगी व्यक्तीला लाच घेताना रंगेहाथ पकडले; जालना पथकाची धडक कारवाई
सोलापूर: महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील नांदणी तपासणी नाक्यावरून (चेकपोस्ट) अवजड वाहन सोडण्यासाठी तीन हजारांची लाच मागितली. तडजोडीअंती अडीच हजार रुपये घेणाऱ्या वाहतूक निरीक्षकासह खागसी व्यक्तीला जालन्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. तानाजी शिवाजी धुमाळ व अमोल आप्पासाहेब पाटील या दोघांना अटक करण्यात आले आहे.

