अर्रर्र! अल्पवयीन मुलांनी चोरले मित्राच्या वडिलांचे ५ लाख रुपये; आईला दागिने घेतले, घरी फ्रीज आणला, १५ दिवस बिर्याणी, चायनीजवर ताव; नवी दुचाकी घ्यायला गेला अन्‌...

मित्राच्या घरी पतंग उडविण्यासाठी गेल्यावर एका अल्पवयीन मुलाची कपाटातील पैशावर नजर पडली आणि दोघांनी मिळून प्लॅन केला. बाकीचे दोघे त्या घरातील मुलाला पतंग उडविण्याच्या बहाण्याने घराच्या छतावर न्यायचे. दोन-तीन दिवसांत दोघांनी घरातील पाच लाख रुपये लंपास केले होते. काही दिवसांनी ते नवी दुचाकी घ्यायला शोरूमला गेले आणि पोलिसांच्या तावडीत सापडले.
Theft
Theft sakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : मित्राच्या घरी पतंग उडविण्यासाठी गेल्यावर एका अल्पवयीन मुलाची कपाटातील पैशावर नजर पडली आणि दोघांनी मिळून प्लॅन केला. बाकीचे दोघे त्या घरातील मुलाला पतंग उडविण्याच्या बहाण्याने घराच्या छतावर न्यायचे. दोन-तीन दिवसांत दोघांनी घरातील पाच लाख रुपये लंपास केले होते. काही दिवसांनी ते नवी दुचाकी घ्यायला शोरूमला गेले आणि पोलिसांच्या तावडीत सापडले.

रविवार पेठेतील प्लॉटिंगच्या तरुण व्यावसायिकाच्या घरातून पाच लाख रुपये चोरीला गेले होते. त्यांच्या घरात सतत कोणी ना कोणी कामानिमित्त येत असल्याने घर नेहमीच उघडे असायचे. ही संधी साधून कोणीतरी रोकड चोरली असावी, असा त्यांचा संशय होता. त्यानुसार त्यांनी जेलरोड पोलिसांत फिर्याद दिली होती.

सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने चोरट्याचा शोध सुरू केला होता. त्याचवेळी पोलिस शिपाई साईनाथ गायकवाड, कल्लप्पा देकाणे व संतोष वायदंडे यांना खबऱ्याकडून संशयितांबद्दल माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून दोन अल्पवयीन मुलांना पकडले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर पैसे चोरल्याची त्यांनी कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चार लाख १० हजार रुपये हस्तगत केले आहेत.

आठ दिवसांत केला फूल एन्जॉय, पण...

मित्राच्या घरातील पाच लाख रुपये चोरलेल्या दोन अल्पवयीन मुलांचे वागणे बदलले होते. चौघांनी मिळून एकाच रंगाचे कपडे, शूज खरेदी केले होते. एकाने आईसाठी सोन्याचा हार देखील घेतला होता. वीज बिल भरणे दरमहा डोईजड असलेल्या कुटुंबातील त्या मुलाचे वागणे काहींना खटकले होते. आता तो नवी कोरी दुचाकी आणायला गेला होता. त्यावेळी आणखी संशय वाढला आणि पोलिसांना त्याबद्दल खबर मिळाली. गणेशोत्सवात त्याने हार, वर्गणीसाठी मित्रांना पैसे दिले होते. दररोज ते मित्र चायनीज, बिर्याणी खात होते. १२ ते १५ दिवसांत त्या अल्पवयीन मित्रांनी दीड ते दोन लाख रुपये खर्च केले होते, असेही पोलिस सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com