Solapur News : चित्रकार खरात यांच्याकडून तीन हजार रोपांचे वाटप
सोलापूरच्या चित्रकाराने केवळ कॅनव्हासवरच आपली कला प्रदर्शित न करता, प्रत्यक्ष कृतीतून प्रबोधन करणारी कला सोलापूरकरांसमोर बुधवारी सादर केली. सोलापुरातील वृक्षसंपदा वाढवण्याचा ध्यास घेऊन चित्रकार खरात वाढदिवशी हजारो रोपे वाटतात.
Social initiative by artist: sapling distribution drive gains appreciationSakal
सोलापूर : सोलापूरचे चित्रकार सचिन खरात यांनी वाढदिवसानिमित्त ३ हजार रोपे वाटून समाजासमोर अनोखा आदर्श निर्माण केला. अनेक वर्षांपासून ते वाढदिवस रोपे वाटूनच साजरा करतात. यंदाच्या वर्षी सात रस्ता येथे त्यांनी हा रोपे वाटपाचा कार्यक्रम केला.