अरुण गुरुजींनी सुरु केली झाडाखालची शाळा

कोरोनाचे सर्व नियम पाळून ही शाळा त्यांनी भरवली आहे.
अरुण माळी
अरुण माळी esakal
Summary

अरुण माळी आपल्या या शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचीही काळजी घेतात. कोरोनाचे सर्व नियम पाळून ही शाळा त्यांनी भरवली आहे.

रोपळे बुद्रूक (सोलापूर): कोरोनाच्या काळात जगभरातील शाळा बंद झाल्या. तेव्हा रोपळे (ता. पंढरपूर, जि . सोलापूर) येथील एका प्राथमिक शाळेच्या शिक्षकाने मात्र परिघाबाहेर जाऊन एकही दिवस सुट्टी न घेता झाडाखालची शाळा सुरू केली. अरूण माळी हे त्या अवलीया शिक्षकाचे नाव.

आकाशाला गवसणी घालणारी उंच झाडे, पक्ष्यांचा किलबिलाट, गाई गुरांचे हंबरणे, जनावरांच्या धारा काढत असताना चावीतील आवाजाने पुन्हा हंबरणारी वासरे, मधेच कानावर पडणारी कोंबड्याची बांग...अशा निसर्गसंपन्न वातावरणात त्यांची शाळा भरते. त्यामुळे चला मुलांनो आज पाहूया शाळा अरूण गुरुजींची असेच म्हणावे लागते .

अरुण माळी
वाढत्या अपघातांमुळे रोपळे येथील रेल्वे पुलाखालील पाण्यात पणत्या लावून प्रशासनाचे वेधले लक्ष !

केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. या उक्तीतीप्रमाणे अरूण माळी यांनी कोरोनाच्या काळातही अखंडीत शाळा सुरू ठेवली. कोरोनाच्या काळात शाळा बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे मुलांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी त्यांनी सुरवातीपासूनच विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिकवले. गर्दी टाळण्यासाठी त्यांचा हा उपक्रम आजही सुरूच आहे. याशिवाय त्यांनी आपल्या घरीच झाडाखाली शाळा भरवली आहे. या शाळेत सुमारे दहा ते पंधरा विद्यार्थी असतात. इयत्तेचे बंधन त्यांनी ठेवले नाही. एक शिक्षक या शाळेत इयत्ता पहिली ते सहावी पर्यंतचे वर्ग भरतात. सुट्टीच्या काळात शरिराने स्थूल झालेले, अभ्यास विसरलेले, अक्षर लेखन खराब व ऐकून न घेण्याच्या तयारीचे विद्यार्थी या शाळेत दाखल झाले. आता हे विद्यार्थी अस्खलीत वाचन करतात.

अरुण माळी
सोलापूर: 1972 चा इंदिरा गांधी पाझर तलाव कोरडाच

शाळेत आल्या आल्या वाटयांचा सराव करणे हा त्या शाळेचा जणू नियमच बनलाय. आता या शाळेतील मुल समजपूर्वक, लयबध्द व निरामचिन्हांचा वापर करून वाचन करतात. वळणदार अक्षर काढण्याबरोबरच गणित, इंग्रजी व सामान्य ज्ञानाचे धडे गिरवण्यावर भर दिला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांची प्रगती वाखाण्याजोगी झाली आहे. सण व उत्सवातही या शाळेला सुट्टी नसते. उलट या दिवशी अभ्यास डबल दिला जातो. आणि त्या त्या सण व उत्सवाची माहिती देऊन त्यावर सखोल चर्चा केली जाते. एखाद दिवशी शिक्षक नसला तरी त्या दिवशी मुलेच शाळा चालवतात. या शाळेत यापेक्षा आता जादा विद्यार्थी घेणे शक्य नाही. त्यामुळे त्यांनी शाळेत न येणाऱ्या मुलांसाठी व्हिडिओ क्लिप तयार करून त्यांना पाठवतात. काही मुलांना फोन करून जिल्हा परिषदेच्या शाळेत बोलवून त्यांचा अभ्यास घेतात. झाडाखालची शाळा सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत चालते.

अरुण माळी
सोलापूर : स्मार्ट कार्डला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

अरुण माळी आपल्या या शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचीही काळजी घेतात. कोरोनाचे सर्व नियम पाळून ही शाळा त्यांनी भरवली आहे. मुलांच्या वैयक्तिक स्वच्छतेकडेही त्यांचे बारीक लक्ष असतं. मुलांनी हाताच्या बोटांची नखे कापली नाहीत तरी ते स्वतः मुलांच्या बोटांची नखे कापतात. आरोग्याच्या बाबतीत जनजागृती करतात.

कोरोनाच्या काळात ही झाडाखालची शाळा एकही दिवस सुट्टी न घेता सुरु आहे. काळजी घेतल्यामुळे या शाळेतील कोणत्याही विद्यार्थ्याला कोरोनाचा संसर्ग झाला नाही. त्यामुळे अशा नैसर्गिक आपत्तीच्या काळात मुलांची गर्दी कमी करून त्यांचा ऑफलाईन अभ्यास घेणे शक्य असल्याचे अरूण माळी यांनी सिध्द करून दाखवले आहे.

कोरोनाच्या काळात योग्य ती काळजी घेऊन मी झाडाखालची शाळा सुरू केली. शिवाय इतरही विद्यार्थ्यांना ऑफलाईन व ऑनलाईन शिक्षण दिले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले नाही. याचे फार मोठे समाधान आहे.

- अरूण माळी-शिक्षक, रोपळे बुद्रूक, ता. पंढरपूर, जि. सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com