झाडाखालच्या शाळेत किल्ला बनवण्यासाठी सुरु झाली लगबग

चिमुकल्यांची किल्ला बनवण्यासाठी लगबग सुरु झाल्याचे पाहायला मिळाले.
झाडाखालची शाळा
झाडाखालची शाळाesakal
Updated on
Summary

रोपळे (ता. पंढरपूर) येथील झाडाखालच्या शाळेत कोरोनाचे नियम पाळत चिमुकल्यांची किल्ला बनवण्यासाठी लगबग सुरु झाल्याचे पाहायला मिळाले.

रोपळे बुद्रूक (सोलापूर) : दिवाळी सर्वत्र उत्साहात साजरी होते. त्यातही महाराष्ट्राच्या दिवाळीचे एक आगळे-वेगळे वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे दिवाळीशी असलेला किल्ल्यांचा संबंध. महाराष्ट्रात किल्ल्यांचं आणि दिवाळीचं एक अतूट नातं आहे. किल्ला म्हणजे दिवाळी आणि दिवाळी म्हणजेच किल्ला असे जणू समीकरणच तयार झाले आहे. रोपळे (ता. पंढरपूर) येथील झाडाखालच्या शाळेत कोरोनाचे नियम पाळत चिमुकल्यांची किल्ला बनवण्यासाठी लगबग सुरु झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान किल्ला बनवताना आम्हाला लय मजा वाटत असल्याचे चिमुकल्यांनी सांगितले.

झाडाखालची शाळा
अरुण गुरुजींनी सुरु केली झाडाखालची शाळा

कोरोना आणि त्यातच गाठून आलेल्या दिवाळीच्या सुट्टीमुळे चिमुकली मुलं आपापल्या घरीच थांबली आहेत. येथील जिल्हा परिषदेचे शिक्षक अरूण माळी यांनी मात्र कोरोनाच्या काळात एकही दिवस सुट्टी न घेता झाडाखालच्या शाळेचा वेगळाच उपक्रम बनवला आहे. या झाडाखालच्या शाळेतील मुलांनाच आता शाळेत नाही आले तर करमत नाही. सध्या दिवाळीची चाहूल लागताच घराघरांतून लहान मुले, शाळकरी मुले व जाणत्या माणसांचीही गड-किल्ले बनवण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. किल्ला बनविण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव ही मंडळी अगदी उत्साहाने करत आहेत. प्रत्येकाच्या अंगणात किल्ला तयार करण्यासाठी बाळगोपाळांचा मेळा जमत असतो. तसा या झाडाखालच्या शाळेतील मुलांचा मेळा किल्ला तयार करण्यासाठी जमवला आहे. निसर्गाच्या कुशीत त्यांनी किल्ला बनवायला सुरूवात केली आहे.

झाडाखालची शाळा
दिवाळीत 'किल्ला' का बनवतात?

आमच्या शाळेला सुट्टी कधीच नसते. सणासुदीच्या दिवसातही मुल स्वतःहून या शाळेत येतात. म्हणून त्यांना आम्ही लहान वयातच गड-किल्ले व छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहित व्हावा म्हणून किल्ला बनवण्याबरोबरच कृतीयुक्त शिक्षणाच्या माध्यमातून इतिहासही शिकवत आहोत.

- अरूण माळी, शिक्षक, जिल्हा परिषद शाळा, रोपळे बुद्रूक, ता. पंढरपूर

झाडाखालच्या शाळेत एक दिवस जरी नाही गेलो तरी आम्हाला घरी करमत नाही. दिवाळीच्या सुट्टीतही आम्ही मित्र या शाळेत सोबत असतो. त्यामुळे किल्ला बनवायला छान मजा येते. किल्ला बनवत असतानाच अरूण माळी सर गड-किल्ल्यांची छान माहिती देतात.

- कपिल काळे, विद्यार्थी

किल्ला बनवत असतानाच अरूण माळी सरांनी गड किल्यांची माहिती सांगत असताना इतिहासातील काही प्रसंग आमच्या डोळ्यासमोर उभे केले. त्यामुळे गड-किल्ले आणि इतिहास का समजून घ्यायचा तेही समजले.

- सई खपाले, विद्यार्थिनी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Emergency Rural Safety System Suspended in Solapur Over Lack of Funds
 Inspector of Police
MLA Dr. Babasaheb Deshmukh
Congress spokesperson Hanumant Pawar criticizes BJP over Ram Mandir credit politics and 'Ladki Bahin' scheme policy
Marathi News Esakal
www.esakal.com