esakal | Pandharpur Elections : आवताडेंचा विजय पक्का ! कार्यकर्त्यांनी उधळला गुलाल

बोलून बातमी शोधा

Awtade

Pandharpur Elections : आवताडेंचा विजय पक्का ! कार्यकर्त्यांनी उधळला गुलाल

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : गेल्या दीड-महिन्यांपासून चर्चेत असलेल्या व अख्ख्या राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या, राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर -मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. पहिल्या काही फेऱ्यांत आघाडीवर असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांना सलग 35 व्या फेरीपर्यंत मागे टाकून आघाडी घेतलेले भाजपचे उमेदवार समाधान आवताडे हे विजयी होण्याच्या मार्गावर असून, आणखी दोन फेऱ्यांनंतर त्यांना विजयी घोषित करण्याची औपरिचारिकता शिल्लक आहे. त्यामुळे आवताडे यांच्या कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष साजरा करून आवताडेंवर गुलाल उधळला.

अद्याप दोन फेऱ्या बाकी आहेत, पण भाजप समर्थकांनी विजयी जल्लोष सुरू केला आहे. राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळाली. सुरवातीच्या काही फेऱ्यांमध्ये आघाडी घेतलेले भगीरथ भालके यांची आघाडी तोडत आवताडेंनी जी आघाडी घेतली, ती शेवटपर्यंत टिकवून ठेवली. समाधान आवताडे यांना 35 व्या फेरीअखेर 4549 मतांची आघाडी होती. त्यानंतर, आवताडे यांच्या घराबाहेर भाजप समर्थकांकडून विजयी जल्लोष करण्यात आला.

हेही वाचा: Pandharpur Elections : आवताडे विजयाच्या उंबरठ्यावर ! फेरी 35वी आघाडी 4395 मतांची

या मतदारसंघात एकूण 19 उमेदवार रिंगणात होते, पण इतर उमेदवारांना हजार मतंही घेणं अवघड बनलं होतं. समाधान आवताडे यांनी 19व्या फेरीपर्यंत म्हणजे पढरपूर शहर आणि ग्रामीण भागातील मतमोजणी होईपर्यंत आपली आघाडी कायम ठेवली. त्यानंतर, मंगळवेढा येथील मतमोजणीला सुरवात होताच, त्यांच्या आघाडीच्या मतांमध्येही चांगली वाढ झाल्याचे सातत्याने दिसून आलं.