

Solapur Politics Heats Up as Owaisi Calls for Historic Mandate on the 15th
Sakal
सोलापूर: १५ मिनिटांच्या ‘त्या’ वक्तव्याने एक इतिहास घडवला होता, आता येणाऱ्या १५ तारखेला पुन्हा एकदा इतिहास घडवण्याची संधी तुमच्याकडे आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीत ‘एमआयएम’च्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करून सोलापूरच्या राजकारणात नवा अध्याय लिहा, असे आवाहन एमआयएम पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केले. सोलापुरातील पानगल प्रशालेच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.