Massive Cleanliness Drive Ahead of Palkhi Arrivalesakal
सोलापूर
Ashadhi Wari : ‘झाडू संतांचे मार्ग, करू पंढरीचा स्वर्ग’; आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर ४२ ठिकाणी स्वच्छता, १४८ टन कचरा जमा
Ashadhi Wari Cleanup : रविवारी पहाटे महापालिकेच्या बसेसमधून महास्वच्छता अभियानासाठी १०० कर्मचाऱ्यांचे एक असे दोन पथक २०० सफाई कर्मचारी पंढरपूरकडे रवाना झाले. एकाचवेळी शहरातील ४२ ठिकाणची स्वच्छता मोहीम हाती घेतली.
पंढरपूर : झाडू संतांचे मार्ग करू पंढरीचा स्वर्ग, या संतांच्या उक्तीप्रमाणे आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये पंढरपूर शहरात महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. स्वच्छता मोहिमेद्वारे पंढरपूर शहरातून सुमारे १४८ टन कचरा जमा करून त्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावण्यात आली. स्वच्छता मोहिमेमुळे पंढरपूर शहरातील रस्त्यांसह गल्लीबोळ व चंद्रभागा वाळवंट चकाचक झाले आहे.