Solapur : आसामच्या खुद्द मुख्यमंत्र्यांना शहाजी बापूंच्या डायलॉगची भुरळ

सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या "काय झाडी, काय डोंगार...एकदम ओके!"
Solapur
Solapur Sakal

सांगोला : सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या "काय झाडी, काय डोंगार...एकदम ओके!" डायलॉगमुळे प्रसिद्धीच्या झोकात आले होते. परंतु गुवाहाटीला मुख्यमंत्र्यांसोबत दर्शनाला गेलेल्या शहाजी बापूंच्या या डायलॉगची भुरळ खुद्द आसामच्या मुख्यमंत्र्यांन्यांनाही पडली. आसामधील कार्यक्रमातच बापुंना पुन्हा डायलॉग म्हणावयास सांगितला. बापुंनीही तो डायलॉग मराठीसह इंग्रजीतही म्हणून दाखविला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिंदे गटातील अनेक मंत्री, आमदार, खासदार गुवाहाटीला गेले होते. या दौऱ्यात त्यांनी कामाख्या देवीचं दर्शनही घेतलं. या दौऱ्यात आमदार शहाजीबापू पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिंदे गटातील  आमदार, खासदार यांनी गुवाहाटीचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी भेट घेतली. यावेळी आसामच्या मुख्यमंत्र्यानी या जुन्या डायलॉगची आठवण करून दिली. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी आमदार शहाजीबापूंना तो जुना डायलॅाग पुन्हा बोलायला लावला. यावेळी आमदार शहाजीबापू पाटील यांनी त्यांच्या विनंतीचा मान राखत पुन्हा तो डायलॉग म्हणून दाखविला. विशेष म्हणजे शहाजीबापूंनी त्यांचा डायलॉग मराठी भाषेसह चक्क इंग्रजीत बोलून दाखवत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. 

 मुखमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ४० आमदारांनी पाच महिन्यांपूर्वी बंड केले. शिवसेनेतून बंड करून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार खासदार राज्यातून सुरतला गेले आणि तिकडून गुवाहाटीला. यावेळी सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील हे ठाकरे यांना सोडून शिंदे गटात गेले आणि तेही गुवाहाटीला जाऊन पोहोचले. गुवाहाटीला गेल्यानंतर त्यांना सांगोल्यातून आलेला एक फोन कॉल प्रचंड व्हायरल झाला. त्या फोन कॉलमधील शहाजीबापू पाटील यांचा एक डायलॉग खूपच प्रसिद्ध झाला. "काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, सगळं एकदम ओक्के...!" हा डायलॉग प्रचंड व्हायरल झाला, इतकंच काय तर या डायलॉगवर गाणी देखील प्रचंड फेमस झाली आहेत. आमदार शहाजीबापू पाटील जिथं जातील तिथं हा डायलॉग म्हणण्याची त्यांना विनंती केली जाते आहे.

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी "काय झाडी..." डायलॉगची आठवण करून दिली. यावेळी मला समोर बोलवून तो डायलॉग पुन्हा म्हणावयास सांगितला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र में कैसा चल रहा है ? असा प्रश्न केला त्यावेळी 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी के नेतृत्व में सब कुछ ओके चल रहा है!' असे मी बोलून दाखवले - शहाजी बापू पाटील, आमदार, सांगोला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com